culprit arrested
culprit arrested sakal media
मुंबई

डोंबिवली : पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या; चौघांना अटक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवलीतील (Dombivali) ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कांदू (Journalist Shriram kandu) यांना त्यांच्या दुकानात शिरून मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी कल्याण गुन्हे शाखेने (Kalyan crime branch) ठाणे व दिवा येथून चार जणांना अटक केली (Four culprit arrested) असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. विशाल ऊर्फ बबन खांडेकर, अमोल सावंत, श्याम ऊर्फ हिरू रेवणकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून आणखी दोघांचा शोध घेतला जात आहे. ही मारहाण का करण्यात आली यामागचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकार कांदू यांचे नामदेव पथ येथे आरती स्विट मार्ट दुकान आहे. सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास दुकानात तीन जणांनी येऊन त्यांच्यावर हल्ला करून पळ काढल्याची घटना घडली होती. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण दायमा, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलिस हवालदार बेलदार, माने, गुरुनाथ जरग यांच्या पथकाने तपास सुरू केला.

सीसीटीव्ही व गुप्त बातमीदारामार्फत विशाल, अमोल, श्याम यांना ठाणे व दिवा येथून अटक केली. त्यांनी घटनेची कबुली दिली असून यातील मुख्य आरोपी गौरव शर्मा व कीर्ती अमोलकर असल्याची माहिती आहे. पोलिस या दोघांचा शोध घेत असून त्यांना अटक झाल्यानंतर या घटनेचे कारण उघड होईल. यातील आरोपी श्याम ऊर्फ हिरू हा सराईत गुन्हेगार असून त्याला ७ जूनपासून मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार केलेले आहे. त्याच्यावर कोपरी, राबोडी व ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात ७ गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT