Bhiwandi Nijampur Mahanagar Palika
Bhiwandi Nijampur Mahanagar Palika sakal
मुंबई

भिवंडी पालिका स्थायी समितीत शिवसेना विजयी

CD

भिवंडी - भिवंडी महापालिकेच्या स्थायी समितीत मैत्रीपूर्ण आघाडी असलेल्या काँग्रेस-शिवसेनेमध्ये स्थायी समितीचा निवडणुकीत बिघाडी झाली. त्यामुळे भाजपच्या मदतीने स्थायी समिती सभापतिपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय म्हात्रे विजयी झाले आहेत. या मतदान प्रक्रियेत काँग्रेस पक्षाचे सहा नगरसेवकांनीसुद्धा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लेखी व्हिप न जुमानता शिवसेनेला मदत केली. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नगरसेवक अरुण राऊत यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा फूट पडल्याचे दिसून आले.

भिवंडी पालिका मुख्य सभागृहात ऑनलाईन (दृकश्राव्य) माध्यमाने पीठासन अधिकारी म्हणून तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेस आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार अधिक पाटील, नगरसचिव अनिल प्रधान व दोन्ही उमेदवार सभागृहात उपस्थित होते. एकूण १६ सदस्य असलेल्या स्थायी समिती सभागृहात शिवसेनेचे संजय म्हात्रे यांना शिवसेना २, काँग्रेस ६, कोणार्क विकास आघाडी २ व भाजपाच्या ४ सदस्यांनी अशा १४ सदस्यांनी मतदान केले; तर काँग्रेसचे अरुण राऊत यांच्या पारड्यात त्यांच्यासह रिषिका राका या दोनच सदस्यांनी मतदान केल्याने त्यांना २ मते मिळाली. बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महाराष्ट्रात एकमेकांचे कट्टर शत्रू झालेले भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेना उमेदवाराला मतदान करून ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा नवीन समीकरण जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.त्या सदस्यांवर कारवाईची मागणी
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या काँग्रेस गटनेत्यासह सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी पराभूत काँग्रेस उमेदवार अरुण राऊत यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT