police fir
police fir sakal media
मुंबई

विक्रमगड : आत्महत्येला प्रवृत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

विक्रमगड : तालुक्यातील वाकी येथील रघुनाथ पांडुरंग जाधव (५०) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची (suicide case) घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विक्रमगड पोलिस ठाण्यात (vikramgad police station) गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची मोखाडा पोलिस चौकशी करीत आहेत. आत्महत्येस जबाबदार असलेले विक्रमगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदपी गिते व हवालदार रघुनाथ गावित यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल (police complaint filed) करण्यात यावा, अशी मागणी कातकरी आदिम संघटना आणि आदिवासी एकता मित्रमंडळ या संघटनांकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रघुनाथ पांडुरंग जाधव यांचा ३१ जानेवारी रोजी घराच्या कुंपणाच्या वादावरून शेजारी राहणाऱ्या गावित कुटुंबीयांबरोबर वाद झाला होता. या वेळी जाधव यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे जाधव यांनी तक्रारीत म्हटले होते. दोन्ही बाजूंची चौकशी करून पोलिसांकडून रघुनाथ जाधव यांच्याविरुद्ध चाप्टर केस नोंदवण्यात आली. २ फेब्रुवारीला रघुनाथ जाधव व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध प्रत्यारोप करणारी तक्रार नोंदवल्याने जाधव कुटुंबाला अटक करण्यात आली. त्यानंतर रघुनाथ जाधव व कुटुंबीयांची जव्हार न्यायालयाकडून जामिनावर सुटका झाली.

रघुनाथ जाधव यांना पोलिसांनी कथितरीत्या दमदाटी व शिवीगाळ केल्याने व गावित कुटुंबीयांच्या भांडणाला कंटाळून, घाबरून रघुनाथ जाधव यांनी ५ फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले. उपचारादरम्यान ६ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी जाधव यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात पोलिसांनी शिवीगाळ केल्याचे व अपमानास्पद वागणूक दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानुसार आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी रोशन गावित, योगेश गावित, पंढरी गावित, विमल गावित, यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याचा तपास मोखाडा येथील पोलिस प्रभारी अधिकारी करीत आहेत. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या हस्ताक्षराची पडताळणी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT