School students
School students sakal media
मुंबई

KDMC : गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा !

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली पालिका शाळांमधील (kdmc school) शिक्षणाचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण (Excellent education) मिळावे, यासाठी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr vijay suryavanshi) यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. तसेच महापालिका शाळांचा पट वाढावा आणि जास्तीत जास्त शाळाबाह्य मुलांनी महापालिकेच्या शाळेत प्रवेश (school admission) घ्यावा, यासाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘गुढीपाडवा, (Gudi Padwa) शाळा प्रवेश वाढवा’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. याअंतर्गत १८ दाखलपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

गुढीपाडव्याला या उपक्रमाची सुरुवात पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांच्या पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यादेखील उपस्थित होत्या. बारावे येथील महात्मा फुले प्राथमिक विद्यालय, शाळा क्रमांक ६८ मध्ये पुस्तकांची गुढी उभारण्यात आली होती. आजचा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा प्रवेशोत्सव आहे. महापालिकेच्या ५९ शाळांमध्ये एक दिवस आपण प्रेरणा दिवस म्हणून साजरा करूया, त्याचप्रमाणे महापालिका अधिकारी यांनी महापालिकेची एक-एक शाळा दत्तक घेऊन तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असेही ते पुढे म्हणाले.

महापालिका शिक्षक खूप चांगले काम करीत आहेत, त्यांनी आणखी झोकून देऊन तळमळीने काम करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले. या वेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त शिक्षण अनंत कदम, महापालिका सचिव संजय जाधव, प्रशासन अधिकारी जे. जे. तडवी शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आजच्या वर्षाच्या पहिल्या दिवशी कल्याण-डोंबिवली येथील महापालिकेच्या ५९ शाळांमध्ये महापालिका अधिकारीवर्गाने समक्ष उपस्थित राहून दाखलपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आणि विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल, चॉकलेट देऊन स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT