मुंबई

पाली अंबा नदी पुलाची दुरवस्था

CD

पाली, ता. २३ (वार्ताहर) ः वाकण-खोपोली राज्य महामार्गावरील पाली गावालगत असणाऱ्या अंबा नदीवरील पुलाचे लोखंडी रेलिंग व सिमेंटचे कठडे तुटून नदीत पडले आहेत. तर कॉक्रिटचा काही तुटलेला भाग लटकत आहेत. पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शिवाय क्षमतेपेक्षा जास्‍त वाहतूक होत असल्‍याने पूल धोकादायक व जीवघेणा बनला आहे. पुलाच्या दुरुस्‍तीकडे
एमएसआरडीसीसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक तसेच वाहनचालकांकडून संताप व्यक्‍त होत आहे.
अंबा नदीवरील पुलाचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहने नदीपात्रात कोसळून अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी नदी पुलावरून एक कार नदीत कोसळून वृद्ध महिलेला प्राण गमवावे लागले होते. पूल जुना व जीर्ण झाला असून चहूबाजूंनी मोडकळीस आले आहे. क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक पुलावरून होत आहे. त्यामुळे तो केव्हाही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या पुलाच्या शेजारी नवीन पुलाचे काम सुरू आहे, मात्र चार वर्षे उलटूनही नवीन पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेला नाही. परिणामी आजतागायत जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू आहे.

क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक
वाकण-खोपोली राज्यमार्ग हा मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. केवळ एकोणीस टन वजनी भार पेलण्याची क्षमता असलेल्या पुलावरून साठ टनाची वाहतूक होत आहे. त्यामुळे पूल दिवसेंदिवस कमकुवत होत आहे.

अंबा नदीवरील पुलालगत नवीन पुलाचे काम बहुतांश पूर्ण होत आले आहे. येथील जलवाहिनीने दुसरीकडे हलवण्याचे काम सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. नवीन पूल सुरू होईपर्यंत जुन्या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येईल.
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

अंबा नदीवरील जुना पूल अतिशय धोकादायक बनला आहे. संरक्षक कठडे तुटले आहेत. ते नदीपात्रात पडल्याने अधिक धोका आहे. पुलावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील प्रवास असुरक्षित बनला आहे. नवीन पुलाचे काम होईपर्यंत पुलाची तात्पुरती दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
- नीलेश धारिया, नागरिक, पाली

पाली ः अंबा नदीवरील पुलावर खड्डे पडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT