मुंबई

अल्पवयीन मुलीची हेळसांड

CD

अलिबाग, ता. २६ (बातमीदार) ः अत्याचारपीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल १२ ते १३ तास वाट पाहावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अलिबाग ते रेवदंडा, रेवदंडा ते अलिबाग अशी टोलवाटोलवी केल्यामुळे पीडितेला प्रवासाची धावाधावदेखील करावी लागली. वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांचा बेजबाबदारपणा यासाठी कारणीभूत असल्याची तक्रार केली जात आहे. हा प्रकार शनिवारी (ता. २५) घडला.

मुरूड तालुक्यातील ताडवाडी परिसरातील एका मुलीचे अल्पवयीन असतानाच लग्न केल्याचा प्रकार तपासणीदरम्यान उघडकीस आला होता. ही मुलगी गर्भवती राहिली होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात बालविवाहांतर्गत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलीला सोगाव येथे बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. तिची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शनिवारी (ता. २५) दुपारी बारा वाजता तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण, गुन्हा रेवदंडा पोलिस ठाण्यात दाखल असल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी न्या, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता प्रकरण ताडगाव परिसरात घडले असून ते आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगत मुलीला बोर्ली येथे नेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे महिला कर्मचारी कीर्ती म्हात्रे या मुलीला घेऊन बोर्ली येथे घेऊन गेल्या; पण तिथे एमबीबीएस डॉक्टर नसल्याने अलिबाग जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला तेथील कर्मचाऱ्यांनी दिला. तेव्हा पुन्हा एकदा पोलिस कर्मचारी मुलीला घेऊन अलिबागला गेले. रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास मुपडे, पोलिस उपनिरीक्षक नंदगावे यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉ. शुभम शर्या यांना तपासणी करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी हात झटकून परत रेवदंडा येथे जाण्यास सांगितले. इतकी वणवण केल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या सूचनेनुसार बोर्ली येथे डॉ. सौरभ घरडे यांनी पहाटे जवळपास दोन वाजता मुलीची वैद्यकीय तपासणी केली.
----------------------------
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉ. सौरभ घरडे यांना सूचना केल्या. त्यानुसार बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन डॉ. सौरभ घरडे यांनी वैद्यकीय तपासणी केली आहे.
- सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी
---
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी महिला पोलिस कर्मचारी यांच्यासमवेत मुलीला अलिबागमधील जिल्हा रुणालयात पाठवले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळाले नाही. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली व रेवदंडा येथे पाठवले. त्या ठिकाणीदेखील वेळेवर तपासणी झाली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता मेडिकल झाली. शासकीय कागदपत्र सोबत असतानाही सहकार्य मिळाले नाही.
- देवीदास मुपडे, पोलिस निरीक्षक, रेवदंडा पोलिस ठाणे
- - - - - - -
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत टाळाटाळ झाली असल्यास संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून खुलासा घेतला जाईल.
- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT