मुंबई

रायगडमध्ये ११५ जणांना अनुकंपाखाली नोकऱ्या

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे अकस्मात निधन किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या कुटुंबाचा गाडा चालावा, यासाठी पात्र असलेल्या वारसाला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्यात येते. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेने मागील तीन वर्षांत वेळोवेळी अनुकंपा भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रियेतून ११५ कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडून सोडवण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांनी दिली आहे. ''सरकार आपल्या दारी'' अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. काही वर्षांपासून अनुकंपा भरती रखडली होती. मात्र, डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपासून जिल्हा परिषद अंतर्गत ही भरती प्रक्रिया वेळोवेळी राबवली आहे. यावर्षी एकूण ३८ जणांना जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील प्रत्येक विभागाकडून रिक्त पदांचा आढावा घेत अनुकंपाच्या नियुक्तीची पदे निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर अनुकंपा भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येऊन, पात्र वारसाला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने पारदर्शकपणे ही अनुकंपा भरती प्रक्रिया राबवली आहे. अनुकंपा भरती प्रक्रियेत नियुक्ती आदेश मिळालेल्या उमेदवारांनी त्यांना मिळालेल्या संधीच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा करण्यावर भर देण्यात यावा. नियमांमध्ये पात्र असलेल्या नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टिने काम करावे, असे आवाहन डॉ. किरण पाटील व नीलेश घुले यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT