मुंबई

अंनिसचा रायगड शाखेच्या अध्यक्षपदी निर्मला फुलगावकर

CD

अंनिसचा रायगड शाखेच्या अध्यक्षपदी निर्मला फुलगावकर
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा प्रेरणा व संकल्प मेळावा खोपोली येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी दोन वर्षांकरिता कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली असून, रायगड जिल्ह्याच्या समितीच्या अध्यक्षपदी निर्मला फुलगावकर यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड जिल्हा आयोजित जिल्हा प्रेरणा व संकल्प मेळावा रविवारी (ता. ०६) खोपोली येथे महाराष्ट्र अंनिस राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांच्या उपस्थितीत पार पडला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ३५ वर्षे महाराष्ट्रात कार्यरत आहे. समितीची जिल्हा कार्यकारिणी प्रत्येक दोन वर्षाने निवडली जाते. संघटनेच्या उपाध्यक्षपदी डॉ. भगवान लोखंडे, कार्याध्यक्ष म्हणून संदीप गायकवाड, प्रधान सचिव महेंद्र पाटेकर, बुवाबाजी विरोधी संघर्ष विभाग सुभाष पानसकर, विविध उपक्रम विभाग प्रभाकर नाईक, वैज्ञानिक जाणिवा शि. प्र. विभाग- डॉ. दत्ता कुंटेवाड, महिला सहभाग विभाग-सुविधा गायकवाड, युवा सहभाग विभाग- श्रावणी मगर, प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग- मनोहर तांडेल, विज्ञान बोध वाहिती विभाग- मोहन मिठागरे, सोशल मीडिया कार्यवाह म्हणून सिद्धेश गोसावी यांची निवड झाली आहे. या कार्यक्रमास निरीक्षक म्हणून महाराष्ट्र अंनिस राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशिलकर व राज्य सरचिटणीस विजय परब यांनी काम पाहिले. तसेच राज्य महिला विभाग कार्यवाह आरती नाईक, राज्य युवा विभाग कार्यवाह प्रियांका खेडेकर, राज्य मानसिक आरोग्य वि. सहकार्यवाह डॉ. अनिल डोंगरे, निमंत्रित, माजी राज्य सरचिटणीस नितीन राऊत, अंनिपचे संपादक डॉ. नितीन शिंदे, माजी अध्यक्ष यशवंत गायकवाड, खोपोली शाखा अध्यक्ष डॉ. सुभाष काटकदौंड, शाखा उपाध्यक्ष निशा दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT