मुंबई

नियोजनाअभावी पाणीटंचाईच्या झळा

CD

नियोजनाअभावी पाणीटंचाईच्या झळा

जलजीवनची ४० टक्‍के कामे रखडली; जिल्ह्यात १२७ गाव-वाड्यांसाठी २५ टँकरने पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : दीड हजार कोटी रुपये खर्चून रायगड जिल्ह्यात जलजीवनच्या एक हजार ४४५ योजनांचे कामे दोन वर्षांपूर्वी एकाचवेळी सुरू करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्चूनही रायगड जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात १०६ वाड्या आणि २१ गावांना २५ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ही संख्या पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असूनही पुरवठा करण्यासाठी योग्य उपाययोजना न केल्याने नागरिकांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
पावसाळ्यात ज्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होते, अशा गावांनाही उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दरवर्षी २१५ गावे आणि ५५० वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असल्‍याने सरासरी सहा कोटी रुपयांचा आराखडा तयार केला जातो. प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या जलजीवनच्या योजनांमुळे यंदा टंचाई कमी होणे अपेक्षित होते; परंतु तसे झालेली नाही. ग्रामीण भागासह शहरातही अनेक ठिकाणी पाणीकपास सुरू झाली आहे.
पनवेलसारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या तालुक्‍यातील गावेही पाण्यासाठी तहानलेली आहेत. सध्या या पनवेलमधील पाच गावे आणि १४ वाड्यांमध्ये १० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, तर सर्वात जास्त पाणीटंचाई पेण तालुक्यात दरवर्षी जाणवते. या तालुक्यातील ३६ हजार ७३८ नागरिकांना एप्रिलपासूनच टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात.

डिसेंबर २०२४ पर्यंतचे आश्वासन फोल
‘हर घर जल’ या केंद्र सरकारच्या योजनेनुसार रायगड जिल्ह्यासाठी एक हजार ४४४ योजना मंजूर झाल्या होत्या. डिसेंबर २०२४ पूर्वी सर्व योजनांचे काम पूर्ण होऊन जिल्ह्यातील पाणीटंचाई नाहीशी होईल, असे आश्वासन सत्तेतील राजकीय नेतेमंडळी लोकसभा, विधानसभा निवडणुकांपूर्वी देत होते. परंतु प्रत्यक्षात जेमतेम ६० टक्केच योजना पूर्ण होऊ शकल्या. पूर्ण झालेल्या योजनांच्या कंत्राटदाराची बिले काढण्यासाठी सरकारकडे निधीच नसल्‍याने उर्वरित ४० टक्के कामे रखडली आहेत.

पाणी असूनही खारेपाट तहाणलेला
पेण तालुक्यातील नागरिकांना दरवर्षी धरण उशाला आणि कोरड घशाला अशा परिस्‍थितीला सामोरे जावे लागते. हेटवणेसारखे धरण असताना पाणी वितरणासाठी जलवाहिनी न टाकल्याने तालुक्यातील ७० टक्के नागरिकांना धरणाचा काहीच फायदा होत नाही. अंबा खोरे प्रकल्पाचे पाणी रिलायन्स पेट्रोकेमिकल्स, जेएसडब्ल्यू यांसारख्या मोठ्या कंपन्यांना वापरूनही दरवर्षी १३५ दशलक्ष घनलिटर पाणी शिल्लक राहते. याचा वापर केल्यास पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील पाणीटंचाई दूर होऊ शकते. अंबा खोऱ्याच्या डाव्या तीरावरून कुर्डुस येथे आलेल्या कालव्याचे काम ३० वर्षांपूर्वी करण्यात आले होते, पण कालव्याच्या जलवाहिनीला गळती लागल्‍याने पाणी अलिबाग तालुक्यातील कुर्डुसपर्यंत पोहोचलेच नाही.

जिल्ह्यात कोणत्याही गाव, वाडी-वस्तीवर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्यास मागणीनुसार २४ तासांत टॅंकरद्वारे पुरवठा सुरू करण्यात येत आहे. प्रशासनाचे पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला सर्वोच्च प्राधान्य आहे. जिथे पाणीपुरवठा योजना प्रलंबित आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्‍या आहेत. साठा कमी झाल्‍यास जलस्रोत दूषित होऊ शकतात. परिणामी साथीचे आजार उद्भवू शकतात. हे लक्षात घेऊन पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याची तपासणी केली जात आहे.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी


जिल्ह्यातील सिंचनाची स्थिती
मोठे प्रकल्प- १
मध्यम प्रकल्प- ४
लघु सिंचन प्रकल्प (राज्य) - २८
लघु सिंचन प्रकल्प (स्थानिक) - १६
पाझर तलाव - ३६
कोल्हापूर बंधारा- ६३
साठवण बंधारा- ५९
सिंचन विहिरी- ५४२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid on Congress MLA : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या ठिकाणांवर 'ED'चे छापे; कोट्यवधींचे सोने अन् रोकड जप्त

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटांवर गांधी नव्हे, नेताजींचा फोटो! आरबीआयच्या आधीची बँक कोणती? वाचा नेताजींच्या चलनाची अज्ञात कहाणी

Latest Marathi News Live Updates : छत्रपती संभाजी नगर तालुक्यात ढगफुटी

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

SCROLL FOR NEXT