मुंबई

खंडित वीजपुरवठ्यामुळे वरसोलीकर बेजार

CD

अलिबाग, ता. २८ : महावितरण कंपनीने मॉन्सूनपूर्व कामे केली नसल्याने मुसळधार पावसात वरसोली ग्रामपंचायत हद्दीत वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. यामुळे संतप्त झालेल्‍या ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. २७) उपसरपंच मिलिंद कवळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी कार्यकारी अभियंता शैलेशकुमार यांच्यासोबत शिष्टमंडळाने चर्चा केली. काही दिवसात सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी शैलेशकुमार यांनी दिले.
वरसोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. पावसाळा सुरू होत असताना दिवस-रात्र केव्हाही कंडक्टर तुटण्याचे प्रकार घडतात. रात्रीच्या वेळी वीज खंडित झाल्‍यास सकाळपर्यंत वीज गायब असते. त्‍यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
कोळीवाडा, खंडाळकर आळी-ताडआळी, बुरुमखाण, नांदे या भागात विजेचा दाब कमी-जास्त होतो. तेथील ट्रान्स्फॉर्मर १००-२०० केव्हीचे टाकणे आवश्यक आहे; मात्र तसे नसल्‍याने पथदिवे नादुरुस्‍त होतात. मग त्‍यांच्या दुरुस्‍तीसाठी चार-पाच दिवसांचा कालावधी लागतो. नांदे-विजयनगर येथील उच्च दाबाची वाहिनी असलेला वीजखांब वाकला आहे. दोन एलटी सिमेंट खांबही मोडकळीस आले आहेत. तिन्ही खांब तातडीने बदलणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्‍यास कुणाला संपर्क करावा, असा प्रश्‍न नागरिकांना पडतो. नादुरुस्त कंडक्टर तातडीने बदलून व विजेबाबत असलेल्‍या समस्या सोडवण्याची मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे. या वेळी संजय पाटील, नितीन माळवी, हर्षल नाईक, नम्रता वर्तक, नमिता माळवी, संजय कवळे, नितीन खाडे, गौरीश घरत, नितीश पाटील, विनोद घरत, प्रतीक म्हात्रे आदी  उपस्थित  होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi Speech Live Update : पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, देशाला करणार संबोधित

Independence Day 2025 : पंतप्रधान मोदींचे राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, लाल किल्ल्यावर बाराव्यांदा तिरंगा फडकवणार

Solapur Monsoon Update: साेलापुरला मुसळधार पावसाचा इशारा! 'हिप्परगा तलाव फुल्ल, प्रवाह मंदावला'; सांडव्यातून ४०० क्युसेकचा विसर्ग

Child Daycare Tip: मुलांना डे-केअरमध्ये पाठवताय? तर पालकांनी ह्या प्रकारे घ्या सुरक्षेची काळजी

वेतन अधीक्षकांचे आदेश! ‘ही’ कागदपत्रे नसलेल्या शिक्षकांचा थांबणार पगार; ऑगस्टच्या पगारबिलासोबत मुख्याध्यापकांना जोडावी लागणार सर्वांची कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत

SCROLL FOR NEXT