पाली, ता. १४ (वार्ताहर) : उन्हाळी सुट्ट्या संपल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवारपासून (ता. १६) सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, उत्साह आणि आनंद संचारलेला दिसतो. यंदा पहिलीचे विद्यार्थी कृती अन् भाषेवर भर देणारी पुस्तके अभ्यासणार आहेत. सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रमाचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून केला आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी समग्र शिक्षा विभागाकडून सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटण्यात येणार आहेत. तसेच हा दिवस पुस्तकदिन म्हणूनदेखील साजरा केला जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी प्रभातफेऱ्या आणि दिंडी काढण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी मुलांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. पहिलीत दाखल मुलांची गावातून वाजतगाजत, लेझीमच्या तालावर मिरवणूक काढली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून बालवाटिका ते पहिली वर्गाला पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम-२०२४ लागू करण्यात आला आहे.
----------------
असे आहे पहिलीचे पुस्तक
पहिलीच्या सीबीएसई पॅटर्नवर आधारित नव्या पाठ्यपुस्तकात कृती, खेळ आणि भाषेवर भर देत विद्यार्थ्यांना संकल्पना समजून सांगण्याला प्राधान्य दिले आहे. सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रमाचा स्तर उंचाविण्याचा प्रयत्न केला आहे. भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तकात गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसा फरक नसला, तरीही भाषा समृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
------------
नवीन पाठ्यपुस्तकांची वैशिष्ट्ये
नवीन पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्यासाठी स्थान मिळणार आहे. संवाद कौशल्यात वाढ, भारतीय ज्ञान प्रणालीची ओळख होईल. मातृभाषेतून संकल्पना समजण्यावर भर, संदर्भ म्हणून स्थानिक परिस्थितीचा आधार, सोप्या भाषेत गणितीय संकल्पना शिकता येणार आहेत. भाषा समृद्धीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
--------------------
वैशिष्ट्यपूर्ण तीन पुस्तके
पहिलीसाठी मराठी, गणित आणि इंग्रजी अशी तीन पाठ्यपुस्तके आहेत. मराठीच्या पाठ्यपुस्तकात नऊ कवितांसह गोष्टी, चित्रकथा, अक्षरे, स्वरचिन्हे, वाचन पाठ, भाषिक कोडी, भाषिक खेळ आणि कृती या गोष्टी नव्याने शिकायला मिळणार आहेत. गणिताच्या पाठ्यपुस्तकात संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट केल्या आहेत. पाठ्यपुस्तकातील आशय हा शिक्षणाची लक्ष्ये, अभ्यासक्रमाची ध्येय, क्षमता व अध्ययन निष्पत्ती यांच्याशी सुसंगत आहे. पाठ्यपुस्तकात कृती, खेळ, गोष्टी आणि गाण्यांचा अंतर्भाव केला आहे. तसेच मुलांच्या ६८ क्षमता विकसनावर भर दिला.
------------------
प्रवेशोत्सवासाठी शाळा सज्ज आहोत. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंद संचारलेला पाहायला मिळत आहे. पाठ्यपुस्तके कृतींवर भर देणारी असून पहिलीची पाठ्यपुस्तके सीबीएसईच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. एनसीईआरटीच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करताना केला आहे. विद्यार्थ्यांच्या कृतीवर, अनुभवावर आधारित शिक्षणाला महत्त्व दिले आहे.
- राजेंद्र अंबिके, प्राथमिक शिक्षक आणि पहिली अभ्यासक्रम प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.