मुंबई

पोलीस कार्यप्रणालीचा विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव

CD

पोलीस कार्यप्रणालीचा विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव
नामदेव सुर्वे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची माणगाव पोलीस ठाण्यास भेट
पाली, ता. ७ (वार्ताहर) : विधी शाखेतील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाचे कामकाज, गुन्ह्यांची चौकशी आणि कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी समजावी या उद्देशाने माणगाव येथील नामदेव सुर्वे लॉ कॉलेजच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी माणगाव पोलीस ठाण्यास भेट दिली. या वेळी पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या अभ्यास भेटीदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र राठोड उपस्थित होते. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजाची माहिती दिली. गुन्हा घडल्यानंतर प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) कसा नोंदवला जातो, त्याचे कायदेशीर महत्त्व काय असते, तसेच गुन्ह्याच्या तपासाची प्रक्रिया कशी राबवली जाते याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
तपासादरम्यान पुरावे गोळा करणे, पंचनामा करणे तसेच दोषारोपपत्र न्यायालयात सादर होईपर्यंतची प्रक्रिया त्यांनी स्पष्ट केली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे कायदेशीर हक्क आणि कोठडीतील नियमावली याविषयीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
चौकट :
पोलीस-वकील समन्वय महत्त्वाचा
केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभाग आणि कार्यप्रणालीची माहिती घेतली. पोलीस आणि वकील हे न्यायव्यवस्थेचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांमध्ये समन्वय असणे आवश्यक असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, असे मत प्राचार्य डॉ. रवींद्र राठोड यांनी व्यक्त केले.


फोटो ओळ, पाली, पोलीस ठाणे भेटी दरम्यान उपस्थित नामदेव सुर्वे लॉ कॉलेजचे विद्यार्थी, प्राचार्य रविंद्र राठोड व पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे.
डॉ. रवींद्र राठोड, प्राचार्य, नामदेव सुर्वे लॉ कॉलेज, माणगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मेष साप्ताहिक राशिभविष्य (१० मे २०२६ ते १६ मे २०२६) : भागीदारीतील अडथळे दूर होणार, करिअरमध्ये नवे मार्ग सापडणार

IPL 2026 Point Table: राजस्थान रॉयल्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? SRH, KKR, CSK कडून हवीय मदत... जाणून घ्या गमतीदार गणित

सिंह साप्ताहिक राशिभविष्य (१० मे २०२६ ते १६ मे २०२६) : करिअरमध्ये उघडणार नवे दरवाजे; प्रसिद्धी आणि आर्थिक लाभाचे संकेत

साप्ताहिक राशिभविष्य : (१० मे २०२६ ते १६ मे २०२६)

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

SCROLL FOR NEXT