मुंबई

पालीतील ऐतिहासिक मराठी शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा लढा यशस्वी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना प्रशासनाकडून हिरवा कंदील

CD

पालीतील ऐतिहासिक शाळेच्या लढ्याला यश
प्रशासनाकडून मागण्यांना हिरवा कंदील; विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

पाली, ता. २६ (वार्ताहर) ः पाली नगर पंचायत कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एकची जागा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुकारलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी झाले आहे. प्रशासनाने या जागेचा वापर केवळ शैक्षणिक कामासाठीच ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर, उपोषणकर्ते जयेश दत्ता चव्हाण यांनी बुधवारी (ता. २५) सायंकाळी आपले उपोषण मागे घेतले.
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जुनी आणि मोडकळीस आली आहे. अशात अज्ञात व्यक्तींनी अनधिकृतपणे शाळेचे दरवाजे, खिडक्या व इतर साहित्य चोरून नेल्याचे समोर आले. या गंभीर प्रकाराची दखल घेत पंचायत समिती सुधागड-पालीच्या शिक्षण विभागाने पोलिस निरीक्षकांना पत्र लिहून संबंधित अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसेच, या जागेवर ज्येष्ठ नागरिक सभागृह उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. याविरोधात माजी विद्यार्थी जयेश चव्हाण व इतर माजी विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारत बुधवारी (ता. २५) पाली पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू केले होते. शाळेची जागा ज्येष्ठ नागरिक सभागृहासाठी न देता ती शैक्षणिक कामासाठीच ही जागा राखीव ठेवावी, ही त्यांची प्रमुख मागणी होती. लोकभावना आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन, गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांना तशी शिफारस केली. त्यानुसार ही जागा आता शैक्षणिक उपयोगासाठीच आरक्षित राहणार आहे.
या वेळी उपसभापती संदेश शेवाळे, युवासेना जिल्हा अधिकारी संजय म्हात्रे, तालुकाप्रमुख अनुपम कुलकर्णी, जिल्हा समन्वयक राजेंद्र राऊत, संपर्क प्रमुख संदीप दपके, विद्येश आचार्य, मंगेश पालांडे, शिवराम पवार यांच्यासह माजी विद्यार्थी ओमकार खोडागळे, प्रवीण काटकर, अमोल गुप्ता, हिमांशू राऊत, गौरव राऊत, आर्या पाटील, कुणाल गोपाळे आणि नागरिक उपस्थित होते.

प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
उपोषणस्थळी उपसभापती संदेश शेवाळे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, त्या जागेवर ज्येष्ठ नागरिक सभागृह न बांधता विद्यार्थ्यांसाठी उद्यानाचे काम हाती घेतले जाईल. प्रशासनाच्या या ठोस आश्वासनानंतर जयेश चव्हाण यांनी उपोषण सोडून प्रशासनाचे आभार मानले.

फोटो ओळ
पाली ः प्रशासनाशी सकारात्मक संवादानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

SCROLL FOR NEXT