अलिबाग-रोहा मार्गाची दुरवस्था
नागरिकांमध्ये नाराजी; तातडीने दुरुस्तीची मागणी
अलिबाग, ता. ५ (बातमीदार) : अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर करत काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
अलिबाग-रोहा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, डांबरीकरण उखडलेले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच धुळीमुळे प्रवास अस्वस्थ करणारा ठरत असून, अपघाताचा धोका वाढल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी व निवेदने देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनीही या प्रश्नावर विधानसभेत लक्ष वेधले असल्याचे सांगण्यात येते. तसेच अलिबाग-रोहा मार्गाला जोडणाऱ्या नवघर पुलाचे कामही संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती व अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत असून, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कोट
अलिबाग-रोहा रस्त्याचे काम गेली कित्येक महिने अत्यंत संथ गतीने सुरू आहे. याबाबत वारंवार संबंधित बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. याचा थेट फटका येथील नागरिकांना बसत आहे. काम नियमितपणे सुरू न झाल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
- अनंत गोंधळी, जिल्हा परिषद सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.