

AAPPI AMCHI COLLECTOR ACTOR DEATH
ESAKAL
महाबळेश्वर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या अपघातात आठ तरुणांनी आपला जीव गमावलाय. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने गाडी तब्बल एक हजार फूट दरीत कोसळली आणि त्यातच स्कॉर्पिओमध्ये असलेल्या सगळ्यांचा मृत्यू झाला. या अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील अभिनेत्यानेही आपला जीव गमावला असल्याची माहिती मिळतेय. या कलाकाराचं नाव महेश पवार असून त्याने 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत काम केलं होतं. आता मालिकेच्या मुख्य अभिनेत्याने त्याच्यासाठी पोस्ट शेअर केलीये.