मुंबई

खोपोली पालिकेत कर भरणासाठी रांगा

CD

खोपोली, ता. २१ (बातमीदार) ः मार्च महिन्यापर्यंत व २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जास्तीत जास्त कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी खोपोली नगरपालिकेकडून मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुलीची जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. याला नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असून, कर भरणा करण्यासाठी पालिकेत रांगा लागत आहेत.
मार्च महिना सुरू होताच पालिकाकडून कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे. एका बाजूला थकबाकीदारांना नोटिसा बजावणे, नळजोडणी खंडित करणे असे कारवाईचे हत्यार पालिकाकडून उगारण्यात येत आहे. नागरिकांना कर भरणा अधिक सोपा व्हावा, यासाठी शहरातील विविध रहिवासी भागात विशेष वसुली पथक नियुक्त करून कॅम्प लावून वसुली करण्यात येत आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून कर भरण्यासाठी पालिकेत रांगा लागत आहेत.

नगरपालिका कार्यालयात पाणीपट्टी व मालमत्ता कर भरणा सुरळीत व्हावा यासाठी अतिरिक्त खिडक्या सुरू केल्‍या आहेत. यात रोख रक्कम, धनादेश व डेबिट कार्ड व ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्‍ध करून देण्यात आली आहे. कर वसुली मोहीमेंतर्गत आठ दिवसांत दररोज सरासरी दहा लाखांच्या वर कर वसुली होत आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने पाणीपट्टी व मालमत्ता कर भरावा.
- अनुप दुरे, मुख्याधिकारी, खोपोली

खोपोली : कर भरण्यासाठी पालिका कार्यालयात गर्दी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT