मुंबई

युवा महोत्सवात महाडच्या प्रतीक्षाची उत्तुंग कामगिरी

CD

महाड, ता. ६ (बातमीदार) : मुंबई येथे रायगड जिल्हा युवा महोत्सव भरवण्यात आला होता. या महोत्सवाच्या चित्र प्रदर्शनात प्रतीक्षा जाधव हिने रेखाटलेल्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे. महाड तालुक्यातील नाते गावची रहिवासी प्रतीक्षा जाधव हिने आर्ट ॲण्ड डिझाईन क्षेत्रात चांगली कामगिरी करत नाते गावासह महाड तालुक्याची मान उंचावली आहे.
देशाचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख, वनराई मोहन धारिया, सद्‍गुरू अनंत महाराज, स्वातंत्र्यसैनिक भाऊ लकेश्री अशा विभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड तालुक्यातील नाते या गावातील रहिवासी असलेली प्रतीक्षा जाधव ही वडील संजय जाधव यांच्या कामानिमित्त पनवेल येथे वास्तव्यास आहे. हुबेहूब चित्र रेखाटण्यात तिचा हातखंडा आहे. आपली आजी, महाडचे आमदार भरत गोगावले यांचे हुबेहूब छायचित्र तिने रेखाटले आहेत. नुकत्याच नेहरू युवा केंद्र वरळी येथे भरवण्यात आलेल्या जिल्हा युवा महोत्सव २०२२-२३ मध्ये प्रतीक्षा जाधव हिच्या छायाचित्राला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे. महाव्यवस्थापक राकेश वेध, संचालक प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमी संचालक डॉ. सुरेश मैन्ड, मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागप्रमुख डॉ. कुणाल इंगले, उपराज्य संचालक यशवंत मानखेडकर, सामाजिक कार्यकर्ता रामकुमार पाल, मुंबई हलचलचे संपादक दिलशद खान यांच्या हस्ते पारितोषिक देऊन प्रतीक्षाला गौरवण्यात आले. सिनेस्टार आमीर खान, शिवाजी साटम यांनीही प्रतीक्षा हिच्या कलेचे कौतुक केले आहे. प्रतीक्षा हिने मिळवलेल्या यशाचे कौतुक नाते ग्रामस्थांनी ती आपल्या गावी आली असता केले.

प्रतीक्षाचा प्रवास
अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत प्रतीक्षा जाधव हिने अपार मेहनत घेऊन हे यश मिळवले आहे. लहानपणापासून तिला चित्रकलेची आवड होती. यासाठी याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय तिने १२ वी कॉमर्सनंतर घेतला. या निर्णयाला तिच्या वडिलांनीही साथ दिली. चित्रकलेची इलिमेंट्री, इंटरमिडीएट परीक्षा, ठाणे येथील फाऊंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रतीक्षाने वडाळा येथील जे. के. अकादमी आर्ट ॲण्ड डिझाईन या महाविद्यालयात जी. डी. आर्ट डिप्लोमा रेखा व रंगकाममध्ये प्रवेश घेतला आणि सध्या ती डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. या दरम्यान तिने अनेक ठिकाणी भरवण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनात सहभाग घेऊन आपली कला सिद्ध केली आहे.

महाड : प्रतीक्षा जाधवने काढलेले चित्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT