मुंबई

दरड कोसळून शिवप्रेमीचा मृत्यू

CD

महाड, ता. ५ (बातमीदार) : रायगड किल्ला पायी उतरत असताना पायरी मार्गावरील महादरवाजाजवळ दरड कोसळ्याने एका तरुण शिवप्रेमीचा मृत्यू झाला. रविवारी (ता. ४) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वेगवेगळ्या कारणांनी मागील काही दिवसांत रायगडावर एक कामगार व दोन शिवप्रेमींचा मृत्यू झाल्याने रायगडचा प्रवास धोकादायक बनत चालला आहे. आज शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी रायगडावर येणार असून यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रशांत गुंड (वय २८, रा. सोलापूर व सध्या राहणार पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या मित्रासह रविवारी रायगडावर गेला होता. रायगड किल्ला पाहून झाल्यानंतर प्रशांत गुंड आणि त्याचा मित्र पायरी मार्गाने खाली उतरत असताना वादळी पावसाला सुरुवात झाली होती. याचदरम्यान हे सर्व महादरवाजाच्या जवळील सपाट मार्गावर आले असता अचानक वरून दरड कोसळली. त्या दरडीतून आलेले दगड प्रशांत यांच्या अंगावर पडले. यात त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या वेळी त्याच्यासोबत असलेला त्याचा एक सहकारीही किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन प्रशांत गुंड यांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

-----------------

दोन दिवसांतील दुर्घटना
२ जून रोजी शिवराज्याभिषेकाच्या तयारीसाठी शिवकालीन देखावा उभा करत असताना जमालुद्दीन शेख या कामगाराला विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच दिवशी शिवराज्याभिषेक दिनी २१ वर्षीय तरुण शिवप्रेमी आपल्या सहकाऱ्यांसह पायरी मार्गाने गडावर चढून जात असताना महादरवाजाजवळ आले असता त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. आता रविवारी पुन्हा रायगडावर घडलेल्या या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये भीतीचे वातावरण आहे.
.................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT