महाड १८ केंद्रावर रनरची नियुक्ती
महाड, ता. १९ (बातमीदार) : महाड विधानसभा मतदारसंघांमध्ये महाड व पोलादपूर हे दोन तालुके तसेच माणगाव मतदारसंघातील तीन जिल्हा परिषद मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात ३९३ मतदान केंद्रे असून बहुतांशी भाग ग्रामीण व डोंगराळ भाग आहे. १८ मतदान केंद्रांवर मोबाईल व लँडलाईनची सुविधा नसल्याने या ठिकाणी सॅटेलाईट फोन व रनरद्वारे संपर्क साधला जाणार आहे. निवडणूक साहित्य तसेच निवडणूक मतदान केंद्रावर काम करणारे कर्मचारी यांची मंगळवारपासूनच मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी धावपळ सुरू झाली होती.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी केंद्र उभारण्यात आले असून या ठिकाणाहून प्रत्यक्ष मतदान केंद्रावर सर्व साहित्य पाठवण्यात आले आहे. मतदान केंद्रावर लागणाऱ्या साहित्याच्या बॅगा तयार करून दिवसभर कर्मचारी त्या नेत होते. साहित्यांमध्ये सुतळी खडू टाचण्यांपासून मतदारांच्या बोटाला लावणारी शाई असे सुमारे २४० वस्तूंचा समावेश आहे.
महाडमधील ३९३ मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या १,७४० कर्मचाऱ्यांकरता वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर ४३ एसटी बस, १६ मिनी बस तर ६७ जीप अशा वाहनाने कर्मचारी व साहित्य रवाना झाले. महाड तालुक्यामध्ये एकही संवेदनशील मतदार केंद्र नसल्याने मतदान शांततेने व सुलभतेने पार पडण्यास मदत होणार आहे. तरीही मतदान केंद्रावर इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ४३० पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आलेले आहेत. मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याच्या सुविधेपासून अपंग मतदारांकरता व्हीलचेअरची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक असणारी सर्व काळजी निवडणूक विभागाकडून घेतली जात आहे.
.........
महाड विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार २,९६,३३८
पुरुष १,४७,२२४
महिला १,४९,१६४
उमेदवार - ५
मतदान केंद्र - ३९३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.