मुंबई

मुंबईत आंतरराष्ट्रीय डाळ परिषद

CD

मुंबई, ता. ५ : जागतिक डाळी व कडधान्ये यासंदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषद मुंबईत येत्या १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होत असून या क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्याबाबत परिषदेत चर्चा होईल.

जगात डाळींचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते; मात्र त्याहीपेक्षा देशांतर्गत मागणी जास्त असल्याने आपल्याला आयातही करावी लागते. ही परिस्थिती बदलून देशात डाळी व कडधान्यांचे उत्पादन वाढावे, यासाठीचा आराखडा या परिषदेत निश्चित केला जाईल. या क्षेत्रात अॅग्री स्टार्टअपचा प्रवेश, संशोधन, डाळ मिलचे आधुनिकीकरण, डाळींची मूल्यवर्धित उत्पादने व उप उत्पादने आदींबाबत माहितीचे आदानप्रदान यावेळी होईल. देशात डाळींचे उत्पादन वाढून नागरिकांना आधुनिक पोषकद्रव्यांची सुरक्षा मिळावी, यादृष्टीने परिसंवादात चर्चा होईल. त्यासाठी शास्त्रज्ञ, अन्न क्षेत्रातील तंत्रज्ञान वापरकर्ते, अन्नप्रक्रिया करणाऱ्या कंपन्या, सेवा पुरवठादार, शेतकरी आदींमध्ये सध्याचे या क्षेत्रातील प्रवाह, भविष्यातील धोरणे, वापरायचे तंत्रज्ञान याची चर्चा केली जाईल, अशी माहिती आयोजक इंडिया पल्स अँड ग्रेन्स असोसिएशनचे बिमल कोठारी यांनी दिली.

------------
डाळींची मागणी साडेतीन कोटी टनांवर
देशातील डाळी व कडधान्ये यांची बाजारपेठ सन २०२६ मध्ये पंचवीस अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याची होईल, असा अंदाज आहे; तर सन २०३०मध्ये भारतातील डाळींची मागणी साडेतीन कोटी टन होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT