मुंबई

औषध खरेदीचे अधिकार ‘डीएमईआर’कडे

CD

मुंबई, ता. २ : राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील औषध पुरवठा करणाऱ्या वितरकांची प्रलंबित देयके, औषध पुरवठ्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला; मात्र या प्राधिकरणाची अंमलबजावणी होईपर्यंत औषध खरेदी संदर्भातील हाफकिन महामंडळाच्या खरेदी कक्षासंदर्भातील सर्व अधिकार ‘वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालया’च्या (डीएमईआर) आयुक्तांकडे सोपवण्यात आले आहेत. यासंदर्भात नुकतेच शासन निर्णय काढण्यात आले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २६ जुलै २०१७ च्या शासन निर्णयानुसार हाफकिन महामंडळामार्फत शासनाच्या विविध विभागांसाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी औषधे व वैद्यकीय उपकरणे इत्यादींची एकत्रित खरेदी करण्यासाठी खरेदी कक्ष स्थापन करण्यात आला. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्था, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना आवश्यक असणारी यंत्रसामुग्री, साधनसामुग्री, उपकरणे, औषधे, सर्जिकल्स साहित्यांची खरेदी हाफकिन महामंडळामार्फत करणे बंधनकारक करण्यात आले; मात्र विविध तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव हाफकिन महामंडळामार्फत निविदा प्रक्रिया राबवून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना पुरवठा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे औषध खरेदी करण्याचे सर्व अधिकार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्तांकडे सोपविण्यात आले आहेत.
---
प्राधिकरणाची स्थापना
रुग्णालयांच्या औषध पुरवठ्याबाबत सरकारवर सर्वस्तरावरून टीका होत आहे. ही बाब लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधांचा पुरवठा सुरळीत व्हावा, तसेच हाफकिन महामंडळाच्या खरेदी कक्षामार्फत करण्यात येणाऱ्या औषधे व अन्य बाबींची प्रलंबित खरेदी प्रक्रिया तातडीने व मुदतीमध्ये पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
---
तातडीने अंमलबजावणी करा!
‘महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ सुरू होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत हाफकिन महामंडळाच्या खरेदी कक्षाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना आवश्यक असणारी यंत्रसामुग्री, साधनसामुग्री, उपकरणे, औषधे, सर्जिकल्स साहित्य खरेदी करण्याचे सर्व अधिकार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्तांकडे सोपवण्यात आले आहेत. या संदर्भात राज्य सरकारकडून शासन निर्णय काढण्यात आळा असून, याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT