मुंबई

गोदरेज टूलिंगचा रेनमॅकशी करार

CD

मुंबई, ता. ५ : गोदरेज ॲण्ड बॉयसच्या गोदरेज टूलिंग विभागाने भारतीय रेल्वे आणि मेट्रो रेल्वेसाठीची जागतिक दर्जाची सामुग्री भारतातच तयार करण्यासाठी रेनमॅकशी दहा वर्षांसाठी सहकार्य करार केला आहे.

या सहकार्यामुळे गोदरेज ॲण्ड बॉयस आता रेल्वेसाठीच्या उपकरणांचे डिझाईन करण्यापासून ती तयार करण्यापर्यंत सर्व प्रक्रियेत स्वदेशी उपकरणांची निर्मिती करू शकेल. एरवी आयात करीत असलेली ही उपकरणे आता भारतातच तयार होतील. तसेच गेली पंधरा वर्षे रेल्वेची भागीदार असलेली गोदरेज ॲण्ड बॉयस आता रेल्वेच्या मोठ्या कामांमध्येही बोली लावू शकेल, असे गोदरेज टूलिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसायप्रमुख पंकज अभ्यंकर यांनी सांगितले.

या करारानुसार आता गोदरेज टूलिंगतर्फे रेनमॅकसह रेल्वे वर्कशॉपमधील उपकरणे विकसित केली जातील. त्यासाठी युरोप, जपान आणि इतर विकसित देशांमधील रेल्वे उद्योगांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेऊन त्याचे स्वदेशीकरण केले जाईल. भारतीय रेल्वेने वंदे भारतसारख्या आधुनिक गाड्या आणि त्याबरोबरच नवीन रेल्वे वर्कशॉप आणि डेपो यांच्यात गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. यातील गोदरेज टूलिंगच्या सहभागामुळे मेक इन इंडिया मोहिमेस पाठबळ मिळेलच, पण या तंत्रामुळे रेल्वे आणि मेट्रो डब्यांची गती, गुणवत्ता आणि सुरक्षिततादेखील सुधारेल, असेही अभ्यंकर म्हणाले.

--------
देशातील रेल्वे जाळे बळकट होणार
गोदरेज ॲण्ड बॉयस या कंपनीला पुढील पाच वर्षांत या क्षेत्रातील वीस ते तीस टक्के बाजारवाटा मिळण्याची अपेक्षा आहे. या करारामुळे देशातील रेल्वे ळे बळकट होईल. गोदरेज टूलिंगतर्फे रेल्वे वर्कशॉप आणि मेट्रो जिग्स आणि फिक्स्चर, ऑटोमेशन सोल्युशन आणि मेट्रो डेपोंसाठी वर्कशॉप उपकरणे पुरवली जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT