मुंबई

नॅकच्या मानांकनासाठी प्रयत्न करावेत ः पाटील

CD

मुंबई, ता. ११ : राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांनी गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि त्यासाठी दर्जा राखण्यासाठी नॅक मूल्यांकन महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते मिळवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने प्रयत्न करावेत, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (ता.११) मुंबईत केले. माजी विद्यार्थी आणि सीएसआरच्या निधीतून शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी आपली स्वतंत्र अशी स्वायत्तता निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि एसएनडीटी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

देशाचे नाव जागतिक स्तरावर अग्रभागी राहण्यासाठी शैक्षणिक धोरणातील बदल महत्त्वाचे आहेत. देशातल्या उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मक सुधारणेचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांनी जबाबदारी घेऊन प्रेरणा जागृत करण्याचे काम करावे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर यांनी केले. या वेळी पनवेल, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आदी स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सादरीकरण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT