किकर - दाभोलकर हत्याकांड
मुंबई, ता. २० : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात खटला सुरू झाल्यामुळे यावर देखरेख कायम ठेवायची की नाही, याबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असे सोमवारी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच याबाबत निर्णय न घेतल्यास हा खटला कधीच संपणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयने सुरू ठेवला आणि त्यात तफावत आढळून आली तर काय, असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला. त्यावर तपास सुरू ठेवण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्याची मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली. तपासावर न्यायालयाने देखरेख ठेवावी, अशी मागणी दाभोलकर यांच्या कुटुबियांच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले असून न्यायालयाने सुनावणी ३१ मार्च रोजी निश्चित केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.