मुंबई

राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार!

CD

मुंबई, ता. २१ : गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उद्या (ता. २२) होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करणार असून यावेळी ते काय भूमिका घेतात, कुणाला लक्ष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकांच्या तारखा जरी अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी सगळ्यांनाच आता या निवडणुकांचे वेध लागले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांप्रमाणे मनसेदेखील मुंबईतील अनेक समस्यांवर जोरकसपणे आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची मुंबईत जाहीर सभा होत असल्यामुळे ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
---
पुन्हा ‘भोंगा’ वाजणार?
काही दिवसापूर्वी सभेबाबत मनसेकडून टीझर लॉन्च करण्यात आला. त्यात ‘मशिदींची मुजोरी संपवावी’, अशा आशयाची भूमिका जाहीर करण्यात आली. यावरून राज ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन पुन्हा एकदा ‘भोंगा’ विषय हाताळणार का, याबाबतही चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय ‘ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व’, ‘ठाकरे’ हा विचार जपण्यासाठी... चला शिवतीर्थावर! या भूमिकेवरही मनसेने लक्ष केंद्रित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT