मुंबई

टीस्समध्ये प्रशासन-विद्यार्थी संघटना आमनेसामने

CD

मुंबई, ता. २३ : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील (टिस्स) भगतसिंग मेमोरिअल लेक्चरमध्ये (बीएसएमएल) बुधवारी (ता. २३) आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाच्या कार्यक्रमावरून प्रशासन आणि विद्यार्थी संघटना पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले होते. रात्री उशिरा प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमच्या सदस्यांनी संस्थाचालकांच्या बंगल्याबाहेर निदर्शने करून निषेध व्यक्त केला.

टिस्स प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी देण्यासाठी मागील दोन दिवसांपासून विद्यार्थी संघटनेची अडवणूक केली. त्यामुळे संघटनेला निषेध करावा लागला. त्यानंतर काल उशिरा परवानगी दिली; मात्र त्यासाठी अनेक जाचक अटी टाकल्या होत्या. त्यामध्ये कोणत्याही बाह्य वक्त्याला परवानगी दिली जाणार नसल्याची अट टाकली. त्यामुळे टिस्स प्रशासनाच्या या अडवणूक प्रकाराचा प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमने (पीएसएफ) सलग दुसऱ्या रात्री निषेध कायम ठेवला असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.

प्रशासनाने बीएसएमएलला परवानगी दिली नसल्याने मंगळवारी रात्री उशिरा पीएसएफ आणि आयोजन समितीच्या सदस्यांनी संस्थाचालकांच्या बंगल्याबाहेर निदर्शने केली. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्षा ऐशी घोष आणि लेखक, मानवाधिकार प्रचारक हर्ष मंदर यांना विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या निधनाच्या निमित्त आयोजित पाचव्या बीएसएमएल या कार्यक्रमात भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते; परंतु टिस्स प्रशासनाने टाकलेल्या अटींमुळे त्यांना सहभागी होता येणार नाही. त्यामुळे आम्ही प्रशासनाचा निषेध व्यक्त करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : 'राजधानी'त भिडणार दिल्ली-मुंबई, कोण जिंकणार?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT