मुंबई

विद्यार्थ्यांच्या शाळेची ‘वाट’ही महागली

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : राज्यातील स्कूलबस ओनर्स असोसिएशनने नव्या शैक्षणिक वर्षासाठी स्कूलबसच्या दरात १५ ते २० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय आज जाहीर केला. त्यामुळे आधीच शाळांच्या शुल्कवाढीने हैराण झालेल्या राज्यातील कोट्यवधी पालकांना आता नवीन शैक्षणिक वर्षात स्कूलबसमुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. या दरवाढीविरोधात पालकांमधून तीव्र प्रतिक्रियाही उमटत आहेत.

केंद्र सरकारने स्क्रॅप, एन युरो, एनआरई धोरण आणल्यामुळे बस उत्पादक कंपनीने दीड ते दोन लाखांची वाढ केली आहे. त्यामुळे नवीन बसचे दर २८ लाख रुपये, तर मिनी बसची किंमत २१ लाखांच्या घरात जाते. तसेच सर्व स्पेअर पार्ट्स, टायर, बॅटरीचे दर १२ ते १८ टक्यांपर्यत वाढले आहेत. स्कूलबसवरील मजुरांच्या पगारात अडीच ते तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत सोडताना आणि तेथून घेताना आम्हाला पार्किंगवर ५० रुपयांचा दंड भरावा लागतो. या पार्श्वभूमीवर दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्कूलबस ओनर्स असोसिएशनकडून सांगण्यात आले.

राज्यात ४४ ते ४५ हजार स्कूलबस धावतात; तर एकट्या मुंबईत साडेआठ हजारांच्या आसपास अधिकृत स्कूलबसेस आहेत. या स्कूलबसचे घरापासून शाळेपर्यंतचे प्रतिकिलोमीटर अंतरानुसार दर ठरविण्यात येतात. सध्या स्कूलबसचे शुल्क किमान १ हजार ५०० रुपये एवढे; तर अधिक अंतरासाठी हेच शुल्क दोन ते तीन हजारांच्या दरम्यान आहे. दरम्यान, या दरवाढीच्या निर्णयाची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
----
दोन वर्षांपूर्वी कोरोना साथीने स्कूलबस जागेवरच उभ्या होत्या. एका बाजूला कोणतेही उत्पन्न नसताना दुसरीकडे बसच्या देखभालीचा आर्थिक भार बसमालकांना सहन करावा लागत होता. अशातच बसचालक आणि वाहक याच्या वेतनातही वाढ झाली आहे. हा सर्व खर्च लक्षात घेता आम्ही स्कूलबसच्या दरात १५ ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
- अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूलबस असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT