मुंबई

समुपदेशिकेविरेाधात ॲट्रॉसिटी गुन्हा नोंदवा

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : आयआयटीमधील दलित विद्यार्थी दर्शन सोळंकी प्रकरणात आयआयटी प्रशासनाने योग्य तपास केला नाही. विद्यार्थी समुपदेशिकेने आपली भूमिका बजावलेली नाही. सोळंकी याच्या एकूण प्रकरणात प्रशासनाने दिरंगाई केल्याचा ठपका देशाच्या अनुसूचित जमाती आयोगाने ठेवत विद्यार्थी समुपदेशिका हिमा अनारडी हिच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. आयआयटी मुंबईसारख्या उच्च शिक्षण संस्थेमध्ये हे घडतेच कसे, अशा कठोर शब्दात ताशेरेही ओढले. तसेच पुढील १५ दिवसांत आत्महत्ये संदर्भातील सर्व माहितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

दर्शन सोळंकीला जातीय भेदभावाची वागणूक मिळाली. यामुळेच त्याने आत्महत्या केली, असा त्याच्या पालकांचा आरोप असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याने याविषयी आयोगाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मुंबई आयआयटी संकुलात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना जातीय भेदभावाच्या वागणुकीला सामोरे जावे लागू नये, यासाठी ठोस उपाययोजनाच नसल्याचा ठपकाही आयोगाने ठेवला आहे. एकूणच पार्श्वभूमी लक्षात घेता आयआयटी मुंबईने संकुलात जातीय भेदभाव होऊ नये, विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आरोग्यविषयक सुरक्षेसाठी एसटी पार्श्वभूमी असलेल्या तज्ज्ञ समुपदेशकांची भरती करण्याची शिफारस केली आहे. तसेच समुपदेशन करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने जाती जमातीचे प्रतिनिधी असले पाहिजेत, असेही आयोगान म्हटले आहे.

विद्यार्थी कल्याण केंद्रामधील मुख्य समुपदेशिका हिमा अनारडी हिची जातीय भेदभावाची वागणूक अत्यंत निषेध करण्यासारखी असल्याचा ठपका ठेवत तीव्र आयोगाने नाराजी व्यक्त केली. आयोगाने केलेल्या शिफारसींमुळेच आयआयटी प्रशासनाने हिमा अनारडीला काढून टाकल्याचे आयोगाकडे सांगितले. आयोगाने पाठवलेल्या पत्राची प्रत संचालकांना पाठविण्यात आली आहे.

विद्यार्थी संघटनेकडून तक्रार
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी आयोगाकडे येथे होत असलेल्या जाती भेदभावाच्या वागणुकीसंदर्भात तक्रार नोंदवण्यात आली होती. या संदर्भातील सुनावणीही आयोगाकडून पार पडली. त्यामध्ये आयोगाने दर्शन सोळंकीच्या प्रकरणाचाही हवाला देत आयआयटी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत

पालकांनी अहवाल नाकारला
१) आयआयटी मुंबईने दर्शन सोळंकी आत्महत्येप्रकरणी केलेल्या शोध तपासाचा अहवाल अर्धवट आणि दुसरी बाजू स्पष्ट करणारा नाही. त्यामुळे आम्हाला तो मान्य नसल्याने आम्ही तो नाकारत असल्याचे पत्र आज दर्शन सोळंकीच्या वडिलांनी आयआयटी प्रशासनाला दिले आहे. अहवाल तयार करताना संबंध‍ितांनी दर्शनच्या मित्रांशी विचारणा केली; परंतु बहिणीला कोणतीही विचारणा केली नाही.
२) शिवाय दर्शनची आत्महत्या जातीय भेदभावामुळेच झाल्याने त्यासाठी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात असली तरी त्यावर निर्णय घेतला जात नाही. शिवाय ज्या शोध समितीने तपास केला त्यामध्ये सामाजिक क्षेत्र आणि मानवधिकार क्षेत्रातील एकाही व्यक्तीला घेण्यात आले नव्हते. त्यामुळे हा तपास निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून करण्याची मागणी आपण करत आहे. आयआयटी मुंबईने दिलेला अहवाल आपल्याला मान्य नसल्याचे दर्शन सोळंकीच्या वडिलाने पत्रात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT