मुंबई

क्षयरोग रूग्णांना घरगुती पौष्टिक आहार : रूग्णालय प्रशासनाचा निर्णय,

CD

टीबी रुग्णालयातर्फे क्षयरुग्णांना
घरगुती पौष्टिक आहार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : क्षयग्रस्त रुग्णाला पौष्टिक आहार फार गरजेचा असतो; परंतु अनेकदा तो गरीब-गरजूंच्या आवाक्यात नसतो. जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून शिवडीतील टीबी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रुग्णांना स्वस्त आणि पौष्टिक आहाराचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
क्षय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये गरिबांची संख्या मोठी आहे. त्यांना आजारपणात आवश्यक असा सकस आहार घेता येत नाही. अशा रुग्णांना स्वस्त आणि मस्त सकस आहाराचे वाटप करण्यात आले. डॉक्टर-परिचारिकांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला. चविष्ट प्रथिनेयुक्त पौष्टिक अन्नासह क्षयरोगावर अत्यंत उपयुक्त असे अन्नपदार्थ रुग्णांना देण्यात आले. मसूर डाळीपासून बनवलेली प्रोटीन पावडर रुग्णांना देण्यात आली. दालचिनीसह मसूर आणि शेंगदाणे भाजून त्याची प्रथिने पावडर बनवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी स्वत: पदार्थ बनवले होते.
क्षयग्रस्त गरीब रुग्णांना पौष्टिक आहार घेणे परवडत नाही. एका प्रोटीन पाकिटाची किंमत किमान ७०० रुपये आहे. ती फक्त महिनाभर टिकते. घरगुती पदार्थ बनवायला सोपे असून बजेटमध्ये आहेत; परंतु बऱ्याच जणांना त्याची माहिती नसते. म्हणून आम्ही पाककृती छापून ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांना आणि डिस्चार्ज मिळालेल्यांना वितरित करण्याचा विचार करत आहोत, असे रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT