मुंबई

परदेशी पाहुण्यांसाठी सुशोभीकरण कामांना वेग

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : जी-२० दोन दिवसीय परिषदेला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यासाठी देशविदेशांतून पाहुणे मुंबईत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पालिकेने जोरदार तयारी सुरू केली असून विमानतळ ते दक्षिण मुंबईदरम्यान सुशोभीकरणाच्या कामाला वेग आला आहे.
मुंबईत २८ ते ३० असे तीन दिवस जी-२० परिषद होत आहे. यासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी पालिका कामाला लागली आहे. या तीन दिवसीय बैठकीत जी-२० सदस्य देशांचे १०० हून अधिक प्रतिनिधी, निमंत्रित देश, प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी होत आहेत. यात जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला गती देण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. हे पाहुणे ज्या रस्त्याने जाणार आहेत त्या विमानतळाच्या टी-१ आणि टी-२ टर्मिनल्सपासून दक्षिण मुंबईपर्यंतच्या रस्त्यांची पालिकेने घाईघाईत डागडुजी सुरू केली आहे. रस्ते चकाचक दिसावेत, यासाठी पुन्हा खडीकरण सुरू केले आहे.
जी-२० च्या निमित्ताने मुंबईभर सुशोभीकरण सुरू आहे. पालिका यावर शेकडो कोटी रुपये खर्च करत आहे. अनेक ठिकाणी यापूर्वी कामे झालेल्या ठिकाणी नव्याने कामे केली जात आहेत. झोपडपट्ट्या दिसू नयेत यासाठी रंगीबेरंगी पडदे लावण्यात आले आहेत. झगमगाटावर भर देण्यात येत आहे. यावर राज ठाकरे यांनी ‘मुंबई आहे की डान्स बार’ अशा शब्दांत टीका केली होती. आता विमानतळ ते दक्षिण मुंबईदरम्यानच्या मार्गावर सुशोभीकरण सुरू आहे.
...
पालिका केवळ व्हीआयपींसाठी आहे का?
सामाजिक कार्यकर्त्यांनी या सुशोभीकरणावर टीकेची झोड उठवली आहे. पालिका केवळ व्हीआयपींची सेवा करण्यासाठी आहे का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी उपस्थित केला आहे. पालिका केवळ व्हीआयपींच्या शहरातील भेटींच्या वेळीच अशा प्रकारची कामे करते; मात्र सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पालिकेकडे वेळ नसतो. जर पालिकेचा अजेंडा केवळ व्हीआयपींना सेवा देण्याचा असेल, तर आता पालिकेची व्यवस्था बरखास्त करावी. कॉर्पोरेट बॉडीच्या धर्तीवर कंत्राटी प्रशासनाच्या माध्यमातून कारभार चालवावा, असेही पिमेंटा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT