मुंबई

जी-२० बैठकांना मंगळवारपासून सुरुवात

CD

मुंबई, ता. २७ ः भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या बैठका मंगळवार ते गुरुवारदरम्यान मुंबईत होतील. जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला गती देण्याविषयक चर्चेत शंभरहून जास्त प्रतिनिधी सहभागी होतील.
पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. २८) व्यापार आणि वित्तीय सहकार्य या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होईल. व्यापाराला वित्तपुरवठा करण्यासाठी बँका, वित्तीय संस्था, विकास वित्तीय संस्था आणि निर्यात पतसंस्था यांची भूमिका, तसेच डिजिटायझेशन आणि फिनटेक सोल्युशन याद्वारे व्यापारासाठी जास्तीत जास्त वित्तपुरवठा कसा करता येईल यावर या परिषदेतील दोन सत्रांत सविस्तर चर्चा होईल. बुधवारी व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या बैठकीचे औपचारिक उद्‍घाटन वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होईल. जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित भारत पाठपुरावा करीत असलेल्या प्राधान्यक्रमांवर चार तंत्रज्ञानविषयक सत्रांमध्ये बुधवारी व गुरुवारी चर्चा होईल. विकास आणि समृद्धीसाठी व्यापाराला चालना आणि सोयीस्कर जागतिक मूल्यसाखळी निर्माण करण्यावर व त्या मूल्यसाखळीत विकसनशील देशांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिले जाईल. गुरुवारच्या बैठकीत जागतिक व्यापारात एमएसएमईचे एकात्मीकरण तसेच व्यापाराचा खर्च कमी होण्यासाठी कार्यक्षम दळणवळण-साठवणूक व्यवस्था उभारण्याला प्राधान्य देण्याबाबत चर्चा होईल. व्यापार गुंतवणुकीला गती देताना मानवकेंद्रित धोरणे आखण्याचेही भारताचे उद्दिष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT