मुंबई

जिल्हाबँकांना राज्य सहकारी बँक मायक्रो एटीएम देणार

CD

मुंबई, ता. २८ : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने (शिखर बँक) बँकांच्या संपूर्ण त्रिस्तरीय रचनेच्या सक्षमीकरणासाठी राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकांना मायक्रो एटीएम म्हणजेच आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम प्रणाली उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत ही योजना सर्वप्रथम भंडारा जिल्हा सहकारी बँकेला आज उपलब्ध करून देण्यात आली.

या सुविधेमुळे जिल्हा बँकांच्या ग्राहकांना आधार कार्डद्वारे संपूर्ण देशात कोणत्याही बँकेच्या मायक्रो एटीएमच्या माध्यमातून रक्कम काढणे, रक्कम जमा करणे, फंड ट्रान्स्फर करणे, शिलकीची माहिती घेणे, मिनी स्टेटमेंट घेणे यांसारख्या सुविधा मिळणार आहेत. आज राज्य बँकेच्या पुणे कार्यालयात बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि नाबार्डचे महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य सरव्यवस्थापक जी. एस. रावत यांच्या हस्ते या एईपीएस सुविधेचे उद्‍घाटन झाले. या वेळी नाबार्डच्या सरव्यवस्थापक रश्मी दराड व राज्य बँकेचे प्र. व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे उपस्थित होते. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये राज्य बँक एईपीएस प्रणालीवर लाईव्ह झाली असून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यांतील एकूण २३ जिल्हा बँकांना ही सुविधा मिळेल.

यासाठी राज्य बँकेने यूआयडीएआयचे थेट सदस्यत्व घेऊन लायसन्स फिसहीत एक कोटी रुपये खर्च केला आहे. जिल्हा बँकांना एक मायक्रो एटीएम खरेदी करण्यासाठी नाबार्डमार्फत साडेबावीस हजार रुपयांपर्यंत अर्थसाह्य मिळेल. सहकार क्षेत्राला राज्य बँक विविध प्रकारे साह्य करीत असून नुकतेच अडचणीतील विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी तीन कोटी रुपये राज्य बँकेने शासनाला दिले आहेत.

----
साखर उद्योगासाठी ‘रेटिंग मॉडेल’
साखर उद्योगासाठी राज्य बँकेने ‘रेटिंग मॉडेल’ सुरू केले असून त्यानुसार आर्थिक शिस्त पाळणाऱ्या कारखान्यांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज मिळेल. अडचणीतील सहकारी संस्थांच्या पुनर्उभारणीसाठी चार वर्षांच्या कालावधीची योजनाही सुरू केली आहे. गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी बँक या वर्षी १ एप्रिलपासून नवीन योजना आणत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT