मुंबई

फेब्रुवारी सर्वाधिक प्रदूषित

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबईतील बऱ्‍याच भागात फेब्रुवारी २०२३ मध्ये हवेच्या गुणवत्तेची पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या सुरक्षित मर्यादेच्या वर होती, असे नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल प्रेडिक्शनने आपल्या अहवालात नमूद केले आहे. काही ठिकाणे वगळता ज्यात मागील वर्षांच्या तुलनेत काही सुधारणा झाली होती; मात्र बऱ्याच भागात प्रदूषणाची पातळी अतिधोकादायक पातळीवर गेल्याने शहरातील वायुप्रदूषणावर नियंत्रणासाठी उपाययोजनांची गरज अधोरेखित होत आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये २० सक्रिय मॉनिटरिंग स्टेशनने डेटा नोंदवला. त्यात प्रदूषणाच्या सरासरी पातळीत ८०.५ टक्के वाढ नोंदवली गेली. फक्त ३ स्थानकांमध्‍ये पीएम २.५ पातळी कमी होती. २० स्टेशनवर नोंदवली गेलेली प्रदूषणाची सरासरी पातळी मागील वर्षाच्या तुलनेत बऱ्यापैकी जास्त नोंदवली गेली. फेब्रुवारी २०२३ मध्ये पीएम २.५ च्या पातळीमध्ये झालेली वाढ ही मागील वर्षाच्या तुलनेत अधिक दिसून आली. २१ पैकी १६ ठिकाणी ही वाढ दिसून आली. बीकेसी, देवनार, चकाला, भांडुप खिंडीपाडा आणि नवी मुंबई येथे इतर ठिकाणांच्या तुलनेत प्रदूषणाची उच्च पातळी आहे, तर कुर्ला आणि बोरिवलीमध्ये कमी पातळी असल्याचे आढळले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबईतील वायुप्रदूषणाची पातळी मागील वर्षाच्या तुलनेत खूपच जास्त होती, असे स्पष्ट झाले आहे.
...
तातडीची कारवाई आवश्यक
विविध स्रोतांकडून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी तातडीची कारवाई करणे आवश्यक आहे. परिणामकारक धोरण, उपायांसह सार्वजनिक वापराला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. वाहतूक, उद्योग आणि वाहनांवर कठोर बंधन लादने आणि शहरातील हिरवळ वाढवणे, वायुप्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे.
...
प्रदूषण कमी करण्यासाठी उद्योग, वीज, वाहतूक आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रांमध्ये नियंत्रण धोरण विकसित केले पाहिजे. शहरातील अनेक ठिकाणचे प्रदूषण सरासरीपेक्षा जास्त आहेत. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्मॉग टॉवर्ससारख्या खोट्या उपायांवर निधी खर्च होणार नाही, याचीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे.

- आरती खोसला, डायरेक्टर, क्लायमेट ट्रेंड्स
...
मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची स्थिती या हिवाळ्यात वाढल्याचे दिसले. ही स्थिती चिंताजनक आहे. हे कमी करण्यासाठी सर्वच स्तरांतून त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
- रौनक सुतारिया, रेस्पायर लिव्हिंग सायन्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT