मुंबई

एलव्हीएम-३ रॉकेट निर्मितीत गोदरेज एरोस्पेसचा मोठा वाटा

CD

मुंबई, ता. २९ : नुकतेच ३६ उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्यासाठी इस्रोने वापरलेल्या एलव्हीएम तीन या रॉकेटच्या निर्मितीत गोदरेज एरोस्पेसने महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

एलव्हीएम तीन हे इस्रोचे आतापर्यंतचे सर्वात वजनदार आणि शक्तिशाली रॉकेट आहे. या रॉकेटचे मुख्य टप्प्यातील एल ११० इंजिन आणि वरील टप्प्यातील सीई २० इंजिन थ्रस्ट चेंबर यांची निर्मिती गोदरेज एरोस्पेसने केली आहे. गोदरेज अँड बॉयसची उपकंपनी असलेल्या गोदरेज एरोस्पेसने इस्रोच्या गेल्या ३० वर्षांच्या पीएसएलव्ही व जीएसएलव्ही मोहिमा यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आतापर्यंत गोदरेज एरोस्पेसने यासाठी १७५ इंजिने आणि अन्य महत्त्वाचे भाग बनवले आहेत. भारताच्या अंतराळ मोहिमेला बळ देण्यासाठी गोदरेजने खालापूर येथील प्रकल्पात अडीचशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. इस्रोच्या सहकार्याने गोदरेज एरोस्पेसने आतापर्यंत अग्निबाणाच्या उपयंत्रणा, पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही अग्निबाणाची द्रवरूप इंधन इंजिने, उपग्रहांना अंतराळ कक्षेत ढकलणारी यंत्रणा आणि संदेशवहनासाठी अँटेना यंत्रणा यांची निर्मिती केली असल्याची माहिती गोदरेज एरोस्पेसचे बिझनेस हेड माणिक बेहरामकमदिन यांनी दिली. गोदरेजने आतापर्यंत भारताच्या चांद्रयान, मंगळयान आणि जीएसएलव्ही एमके तीन या मोहिमांमध्येही भाग घेतला आहे. नुकतेच डीआरडीओसाठी टर्बोजेट इंजिनांची आठ मॉड्युल तयार करण्याचे कामही गोदरेज एरोस्पेसला मिळाले आहे.

एलव्हीएम-३ रॉकेट निर्मितीत गोदरेज एरोस्पेसचा मोठा वाटा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT