मुंबई

महारेराने विकसकांना बजावल्या नोटिसा

CD

मुंबई, ता. ३० : मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध प्रकल्पांमध्ये ग्राहकांना डिसेंबर २३ अखेर घरांचा ताबा देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४० टक्केपेक्षाही कमी काम झालेल्या २६१ विकसकांना महारेराने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
मागील काही महिन्यांमध्ये महारेराकडे नोंदणी झालेल्या २५ ते ५०० कोटींच्या ४५ हजार ५३९ सदनिकांच्या या प्रकल्पांत सुमारे २६ हजार १७८ सदनिकांची विकसकांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीच्या आधारावर महारेराने नोटिसा बजावल्या आहेत. काही विकसकांनी आपले प्रकल्प येत्या ९ महिन्यांत पूर्ण करणार असल्याचे नमूद केले असून ते कसे पूर्ण करणार याचा जाब महारेराने या कारणे दाखवा नोटीसच्या माध्यमातून विचारला आहे. तसेच आपली बाजू येत्या १५ दिवसांत स्पष्ट करण्यासाठी मुदतही दिली आहे.
आतापर्यंत कमी काम झालेल्या प्रकल्पांपैकी मुंबई शहर २६, मुंबई उपनगर ९४, पुणे ६७, ठाणे ४३, रायगड १५, पालघर ६, नागपूर ३, नाशिक २, सातारा, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद आणि दादरा नगर हवेली भागातील प्रत्येकी एका प्रकल्पाचा यात समावेश आहे. त्यात ४० टक्केपेक्षाही कमी काम झालेल्या प्रकल्पांपैकी ५३ प्रकल्पांमध्ये केवळ १० टक्केपेक्षा कमीच काम झाले आहे. ४४ प्रकल्पांत १० ते २० टक्के, ६० प्रकल्पांत २० ते ३० टक्के आणि १०४ प्रकल्पांत ३० ते ४० टक्के एवढेच काम झालेले आहे.
एवढेच नाही, यात २५ टक्के खर्च झालेले १०६ प्रकल्प आहेत. २५ ते ५० टक्के खर्च झालेले ९२, ५० ते ७५ टक्के खर्च झालेले ४७ आणि ७५ ते १०० टक्के खर्च झालेलेही १५ प्रकल्प आहेत. यातील एका प्रकल्पात १०० टक्क्यांपेक्षा जास्त खर्च होऊनही प्रत्यक्षात काम मात्र २० ते ३० टक्के झालेले आहे.
...
नवीन नोंदणीकृत प्रकल्पांना क्यूआर कोड
आता येथून पुढे महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्रासोबत क्यूआर कोडही मिळणार आहे. या क्यूआर कोडमुळे घर खरेदीदारांना या प्रकल्पाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सर्व प्राथमिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. नुकतेच पुण्यातील एका विकसकाला क्यूआर कोडसह नवीन नोंदणीचे प्रमाणपत्र महारेराने जारी केले आहे. यामधून कोणालाही संबंधित प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती पाहता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT