मुंबई

खासगी रुग्णालयात क्षयरोगासाठी केंद्र उभारणार!

CD

मुंबई, ता. १६ : क्षयरोगावरील उपचार अधिक सुलभ व्हावेत, यासाठी क्षयरुग्णांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये औषध प्रतिरोधक केंद्रे सुरू करण्याचा महापालिकेचा विचार आहे. हा उपक्रम राष्ट्रीय क्षय निर्मूलन कार्यक्रमाचा (एनटीईपी) एक भाग आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांना स्वारस्य व्यक्त करण्याचे आवाहन केले. लवकरच संबंधित रुग्णालयांची बैठक होणार आहे.
एमडीआर क्षय रुग्णांसाठी औषधांचा खर्च दरमहा २५ हजारांपर्यंत येतो. ही औषधे कोणत्याही तडजोडीशिवाय दोन वर्षे घ्यावीच लागतात. बरेच रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करतात; परंतु काही काळानंतर अधिक खर्चामुळे ते परवडत नाही; मात्र सदर केंद्र सुरू झाल्यामुळे महापालिका आणि खासगी रुग्णालये यांच्यातील भागीदारीमुळे क्षयरोगाच्या या रुग्णांना प्रोटोकॉलनुसार उपचार, तपासणी आणि काळजी घेतली जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, या उपक्रमांतर्गत क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांना नियमित शुल्क आकारता येणार असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
----
मुंबईला क्षयरुग्णांचा विळखा
वर्ष ----- रुग्णसंख्या
२०२२ ---५,७५८
२०२१ ---५,९७८
२०२० ---४,७७५
२०१९----५,९९७
२०१८-----५,३४३

२३ प्रतिकूल औषध चिकित्सालये
एमडीआर क्षय रुग्णांसाठीच्या इतर योजनांमध्ये महापालिकेने २३ प्रतिकूल औषध दवाखाने सुरू केले होते. या दवाखान्याची सुरुवात झाल्यापासून रुग्ण औषध सोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या पाच वर्षांत हे प्रमाण १६ टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT