मुंबई

रसायन निर्यात वाढवा

CD

मुंबई, ता. १६ : वेगवेगळ्या रसायनांच्या उत्पादनात भारताचा जगात सहावा आणि आशियात तिसरा क्रमांक आहे. या क्षेत्रात जगाचे लक्ष आपल्याकडे लागले आहे. त्यामुळे आपल्या रसायनांचा दर्जा आणि निर्यात वाढवण्यासाठी उत्पादकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय व्यापार राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी येथे केले.

बेसिक केमिकल्स, कॉस्मेटिक्स ॲण्ड डाईज एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (केमेक्सिल) या संघटनेच्या निर्यातदारांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पारितोषिके देण्याचा समारंभ शनिवारी येथे झाला, त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी केमिक्सीलचे अध्यक्ष श्रीनिवास मोकाशी उपस्थित होते. रसायन निर्मिती हा सगळ्यात वेगाने वाढणारा उद्योग असून जीडीपीमधील त्यांचा वाटा ६.७ टक्के एवढा आहे. दोन वर्षांतच हा उद्योग तीनशेचार अब्ज डॉलर मूल्याचा होईल. अजूनही आपल्याला निर्यात वाढवण्याची मोठी संधी आहे. या क्षेत्राला केंद्र सरकार धोरणात्मक पाठबळ देत असून तुमचे सर्व मुद्दे केंद्राच्या विचाराधीन आहेत. या मदतीचा फायदा घेऊन उद्योगाने आपली निर्यात वाढवावी, असे आवाहनही अनुप्रिया पटेल यांनी केले; तर मार्चअखेर या क्षेत्राची निर्यात ३०.३१ अब्ज डॉलर मूल्याची झाल्याची माहिती केमिक्सिलचे अध्यक्ष श्रीनिवास मोकाशी यांनी दिली. केंद्र सरकारने आपल्याला निर्यातीचे जे लक्ष्य दिले होते त्याच्या जवळ आपण गेलो आहोत, असेही त्यांनी सांगितले. संघटनेने पाच वर्षांत आपली निर्यात दुप्पट करावी असे आवाहन या क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा यांनी केले.

--
केंद्राच्या नव्या परदेश व्यापार धोरणामुळे निर्यात वाढत असून स्वच्छ व प्रदूषणविरहित रसायने हे देशाचे भवितव्य आहे. ही रसायने अन्नप्रक्रिया, औषधे, कपडे, बांधकाम आदी क्षेत्रांत वापरली जात असून या रसायनाच्या उत्पादनावरही संघटना भर देत आहे, असेही मोकाशी यांनी सांगितले.
- श्रीनिवास मोकाशी, अध्यक्ष, केमिक्सिल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT