मुंबई

सुदृढ होण्याच्या उपक्रमासह आरोग्य विमा खरेदी करावा

CD

मुंबई, ता. २१ : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याचा खर्च मिळवण्यापेक्षा आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी उपक्रम असलेल्या आरोग्य विमा योजना खरेदी केल्यास लोकांच्या वैद्यकीय खर्चाचे पैसे वाचतील. त्यामुळे अशाच विमा योजना खरेदी कराव्यात, असे आवाहन आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सचे सीईओ मयंक बथवाल यांनी केले.

हल्ली ग्राहकांनाही सुदृढ आरोग्य सेवा हवी आहे आणि काही विमा कंपन्यांचा भरही ग्राहकांना सुदृढ ठेवण्यासाठी त्यांनी चांगली जीवनशैली स्वीकारावी, यावर असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. लोकांना आरोग्य विम्यामधून रुग्णालयाचा खर्च मिळण्यापेक्षा अधिक सेवा हवी आहे; तर आरोग्य विमा उद्योगाचे लक्ष आजारावरील उपचारांपेक्षा आजार होऊच नयेत, यासाठी घेण्याच्या काळजीवर केंद्रित होत आहे, असेही बथवाल म्हणाले.

अनेक आरोग्य विमा योजना सुदृढ आरोग्यासाठी पावले उचलणाऱ्या विमाधारकांना प्रीमियम नूतनीकरणावर सूट देतात किंवा विमा संरक्षण नसलेल्या खर्चाचाही काही वाटा उचलतात. अनेक विमाकंपन्या ग्राहकांना व्यायामशाळा किंवा योगाभ्यास केंद्रात सवलतीच्या दरात सदस्यत्वदेखील देतात. काही विमा कंपन्या ग्राहकांच्या मोबाईल ॲपवर फिटनेस टास्क देऊन ट्रॅकिंग उपकरणेदेखील देतात. हे उपक्रम ‘इरडई’च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगानेच असून त्यांचे उद्दिष्ट ग्राहकांमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढवणे आणि विमा कंपन्यांनाही तशी उत्पादने देण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. त्यामुळे ग्राहकांनीदेखील अशाच विमा योजना खरेदी केल्यास त्यांच्या वैद्यकीय बिलावरचे पैसे वाचतील, त्यांचे शारीरिक आरोग्य राखण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही बथवाल यांनी म्हटले आहे.

जीवनशैली सुधारण्यासाठी प्रोत्साहनाची गरज
आज आरोग्य सेवा खर्चांपैकी होणारे साठ टक्के खर्च हे ओपीडी किंवा विमा संरक्षण नसलेले खर्च असतात. बहुतांशी मेडिकल मेडिक्लेम पॉलिसीत हे खर्च मिळत नाहीत. त्यामुळे लोकांना जीवनशैली सुधारण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठी दररोज व्यायाम करण्यास प्रवृत्त केल्यास, तसेच धूम्रपान, मद्यपान या सवयी सोडल्यास लोकांना मधुमेह, हृदयविकार यांचा धोका कमी होईल, हेही हल्लीच्या आरोग्यविमा सेवेचे सूत्र असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT