मुंबई

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा!

CD

मुंबई, ता. २१ : राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. त्यामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये येत्या ३० एप्रिलपर्यंत शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कक्ष नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठांमध्ये हे कक्ष प्र-कुलगुरू आणि महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली असेल, असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.
यंदापासून पदवीच्या बीए, बीएससी आणि बीकॉम अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांसाठी राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये चौथे वर्ष २०२६-२७ पासून लागू होणार आहे. नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या सुकाणू समितीने अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने काही निकष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांनाच चौथे वर्ष सुरू करण्याची परवानगी असेल. विद्यार्थी संख्येच्या नैसर्गिक वाढीनुसार चौथे वर्ष सुरू करता येणार नाही. केवळ तीन वर्षांचा अभ्यासक्रम चालवणाऱ्या आणि पीजी विभाग किंवा संशोधन केंद्र नसलेल्या महाविद्यालयांना चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. यासोबतच निकष पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षांसाठी निकष पूर्ण केलेल्या अन्य महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल, तर या पदवीच्या अभ्यासक्रमातून बाहेर पडायचे असल्यास विद्यार्थ्यांना प्रत्येक स्तरानंतर क्रेडिट्सचे तपशील द्यावे लागतील. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षानंतर चार वर्षांच्या कार्यक्रमातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना यूजी प्रमाणपत्रासह किमान ४० क्रेडिट्स मिळवणे आवश्यक आहे. त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमातील चार क्रेडिट्स किंवा संबंधित इंटर्नशिप आणि कौशल्य-आधारित अभ्यासक्रमांमधील सहा क्रेडिट्सचा समावेश असेल.
--
सात वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करा!
विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर तीन वर्षांच्या आत अभ्यासक्रमात पुन्हा प्रवेश करू शकतात; परंतु त्यांनी संपूर्ण अभ्यासक्रम सात वर्षांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच चौथ्या वर्षात प्रवेश घ्यायचा असल्यास ७.५ सीजीपीए किंवा तीन वर्ष पदवी अभ्यासक्रमात ७५ टक्के गुण असे आवश्यक असल्याचे मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT