मुंबई

रात्रशाळामधील दुबार नोकरीच्या विरोधात राष्ट्रवादी शिक्षक संघटना आणि शिक्षक परिषद आक्रमक

CD

रात्रशाळांमधील दुबार नोकरीच्या निर्णयाला विरोध
आंदोलन करण्याचा इशारा
मुंबई, ता. २६ : अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना राज्यातील रात्रशाळांमध्ये दुबार नोकरी देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी (ता. २५) शासन निर्णय जाहीर केला; परंतु त्याला विरोध होऊ लागला आहे. शासनाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस रात्रशाळा शिक्षक संघटना आणि शिक्षक परिषदेने तीव्र आक्षेप घेत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात पदवीधर शिक्षक उमेदवार बेरोजगार आहेत. त्यांना नोकरीची नितांत गरज आहे. मात्र, ज्यांना अगोदरच लाखो रुपयांच्या वेतनाची नोकरी आहेत अशा शिक्षकांना पुन्हा काम देऊन शालेय शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय तरुण पदवीधर शिक्षक उमेदवारांना बेरोजगार ठरवणारा आहे, असा आरोप करण्यात येत आहे. गुरुवारी (ता. २७) मुंबईतील आझाद मैदानात विविध शिक्षक संघटना आणि पदवीधर शिक्षक उमेदवार शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात निदर्शने करणार असल्याची माहिती शिक्षक संघटनांकडून देण्यात आली.
मागील वर्षी रात्रशाळांसंदर्भात धोरण ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीच्या माध्यमातून रात्रशाळेच्या गुणवत्तेसंदर्भात अनेक शिफारशी करणे अपेक्षित होते. मात्र, समितीने आपला अहवाल देण्यापूर्वीच शालेय शिक्षण विभागाने रात्रशाळांमध्ये दुबार नोकरीचा जीआर काढून केवळ मुंबई आणि शहरातील काही ठराविक शिक्षकांना आर्थिक लाभ व्हावा म्हणून असा निर्णय घेतला आहे, असा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे.

गुणवत्तेनुसार संधी द्या!
मुंबईत मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक आहेत. त्यांचेही अनेक शाळांवर समायोजन करण्याची गरज आहे. असे असताना आहेत त्याच शिक्षकांना पुन्हा दुबार नोकरी देणे कितपत योग्य आहे, असा सवालही केला जात आहे. त्यासाठी सरकारने निर्णय मागे घ्यावा आणि बेरोजगार तरुणांना गुणवत्तेच्या आधारे रात्रशाळांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT