मुंबई

अमराठी श्रमिकांना मराठीचे धडे!

CD

मुंबई, ता. ३० ः आपले राज्य सोडून मुंबईत रोजगार-नोकरीसाठी आलेल्या हिंदी, तेलगू, कन्नड, भोजपुरी आदी अमराठी श्रमिक आणि भाषिकांसाठी मुंबई विद्यापीठाने सुरू केलेला ‘माय मराठी’ अभ्यासक्रम वरदान ठरत आहे. अभ्यासक्रमामुळे मुंबईत रोजचे व्यवहार करण्यासाठी मराठीची अडचण दूर होत असल्याने अनेक जण ‘माय मराठी’च्या माध्यमातून आपल्या भाषेशी जोडले जात आहेत.

अमराठी भाषिकांना मराठीतून व्यवहार करता यावेत यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने सहा प्रावीण्य पातळ्यांवरील अभ्यासक्रम तयार केला असून त्यासाठीची अंमलबजावणी मागील काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामध्ये अध्ययन, संभाषण कौशल्य, शब्दसंपदा, वाक्यरचना, संवाद आणि शब्दसंपदा यांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने अमराठी भाषकांना आधुनिक पद्धतीने मराठी शिकवणारा ‘माय मराठी’ अभ्यासक्रम तयार करण्याचा प्रकल्प आखला. त्या अभ्यासक्रमात अमराठी भाषकांच्या गरजांचा तपशीलवार विचार केला गेला आहे. प्रकल्पासाठी परकीय भाषा, विशेषत: जर्मन शिकण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शास्त्रीय अध्यापन पद्धतीचा आधार घेण्यात आला. संवादात्मक पद्धतीने अध्यापन केले जात असल्याचे राज्य मराठी भाषा विकास संस्थेकडून सांगण्यात आले. ‘माय मराठी’च्या प्रावीण्य पातळी एकसाठी अभिनेता आमिर खान यांनी सुरुवातीला २५ लाखांची मदत केली होती. पुढील दोन ते सहा पातळ्यांसाठी राज्य मराठी विकास संस्थेकडे जर्मन विभागाने प्रस्ताव दिल्यानंतर त्यासाठी अनुदानही देण्यात आले आहे. त्यासाठी या भाषा प्रकल्पासाठी २०१७ मध्येच करारही झाला असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, अमराठी भाषा प्रकल्पांच्या माध्यमातून चर्चगेटमधील मुंबई रेल्वे विकास कॉपोरेशन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मराठीच्या अध्यापनाचे धडे देण्यात आले. दुसरीकडे आतापर्यंत मराठी संवाद कौशल्याचे तीन वर्ग मागील काही वर्षांत पूर्ण झाले असून त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची १०० गुणांची तोंडी आणि लेखी परीक्षाही घेण्यात आली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राज्य मराठी विकास संस्थेकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. त्यासाठी अमराठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगण्यात आले.

‘माय मराठी’ प्रकल्पाच्या मराठी वर्गात हिंदी, भोजपुरी आणि तमिळ भाषिकांना व विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होत आहे. त्यात नुकतेच तमिळ पदवीधर विद्यार्थ्यांना २८ दिवसांत स्व-परिचय, रंग, एक ते वीस अंक, रोजचा दिनक्रम, लिंग, वचन, तीन कविता, साधा वर्तमानकाळ आणि लिपीची ओळख करून देण्यात आली असून त्या वर्गांसाठी ‘माय मराठी’ पाठ्यपुस्तकांचा आधार घेण्यात आला होता, अशी माहिती देण्यात आली.

इस्राईलसोबतही प्रयोग यशस्वी
अमराठी भाषिकांना मराठी यावी म्हणून २०१६ मध्ये राज्य मराठी विकास संस्था, तेलअविव विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ अशा तीन संस्थांमध्ये करार करण्यात आला होता. त्या करारामुळे मूळचे इस्रायली आणि ज्यांच्या कुटुंबियांना मराठी भाषा कळत होती असे विद्यार्थी, लेखक, चित्रकार आदींना फायदा झाला होता.

अमराठी भाषिकांना अधिकाधिक स्वरूपात मराठी यावी यासाठी राज्य मराठी भाषा विकास संस्था प्रयत्न करत आहे. त्यासाठीच मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने तयार केलेल्या ‘माय मराठी’ उपक्रमाचा खूप फायदा होत असून अनेक अमराठी श्रमिक, कामगार व नोकरदार वर्ग त्यामुळे प्रभावित झाले आहेत.
- संजय पाटील, संचालक, राज्य मराठी भाषा विकास संस्था

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याने भारतीय भाषांना खूप मोठे महत्त्व मिळणार आहे. जर्मन विभागाने तयार केलेल्या अमराठी भाषिकांच्या ‘माय मराठी’ अभ्यासक्रमांचा त्यासाठी विविध श्रमिक घटकांपासून इतरांनाही मोठा लाभ होत आहे; मात्र त्यासाठी अधिक जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.
- प्रा. डॉ. विभा सुराणा, जर्मन भाषा विभाग, मुंबई विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT