मुंबई

एमएच-सीटीई ची राज्यभरात परीक्षा सुरळीत सुरू

CD

एमएच-सीईटीची परीक्षा राज्यभरात सुरळीत सुरू
मुंबई, ता. ९ : राज्यातील सरकारी, अनुदानित आणि विविध व्यवस्थापनांच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या एमएचटी सीईटीला आज राज्यभरात सुरळीत सुरुवात झाली. १३ मेपर्यंत परीक्षा चालणार आहे. राज्यातील मुख्य शहरांपासून जिल्ह्यातील १९६ केंद्रांवर विविध सत्रांत परीक्षा घेतली जात असल्याचेही सांगण्यात आले.
आज सुरू झालेल्या एमएचटी सीईटी परीक्षेत काही अपवाद वगळता कोणत्याही केंद्रांवर विद्यार्थ्यांना अडचणी आल्या नसल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. परीक्षेसाठी यंदा सहा लाख १९ हजार ३३ विद्यार्थी बसले आहेत. त्यात पीसीएम ग्रुपसाठी नोंदणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ९ मेपासून सुरू झाली आहे. पीसीबी ग्रुपची परीक्षा १५ मेपासून सुरू होणार असून २० मे रोजी संपणार आहे. राज्याबाहेरील १५ केंद्रांवर परीक्षा सुरू झाली आहे. पाच दिवस चालणारी परीक्षा विविध सत्रांत ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT