मुंबई

मोकळ्या जागांच्या देखभालीसाठी १३८ कोटींचा खर्च

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः मुंबईतील उद्याने, मनोरंजन मैदानासह मोकळ्या जागांची देखभाल करण्यासाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वतीने सुमारे १३८ कोटी रुपये यासाठी खर्च केला जाणार आहे. काही कंत्राटदारांनी ३० ते ४१ टक्के कमी दराने अर्थात महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा कमी बोली लावून ही कामे मिळवल्याचे सांगून त्याला माजी विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी विरोध केला आहे.
याबाबत बोलताना रवी राजा यांनी सांगितले की, कमी बोली लावून कामे मिळवणे म्हणजे दर्जाहीन काम करणे. या कामात कमी दरातील साहित्य वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कळस म्हणजे हाच उद्योग या कंत्राटदारांनी मागच्या वर्षीही केला होता. म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. असे असताना या वर्षी त्यांनाच पुन्हा कंत्राट कसे देऊ शकता, असा प्रश्न विचारत हे थांबायलाच हवे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या कामांसाठी गेल्या वर्षीदेखील पालिकेने निविदा मागल्या होत्या. त्या वेळी महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा ३० ते ४१ टक्के कमी बोली लावून ही कामे मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी पालिकेने त्यांच्यावर कारवाई केली होती. या वेळीदेखील अशाच प्रकारची बोली लावण्यात आली आहे. या वेळी मात्र कारवाई करण्याऐवजी त्यांना कामे देण्यात आली आहे. त्याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT