मुंबई

आदित्य बिर्ला कॅपिटलतर्फे एमएसएमईसाठी उद्योग प्लस

CD

मुंबई, ता. २८ ः आदित्य बिर्ला कॅपिटलतर्फे एमएसएमई ग्राहकांच्या सर्व आर्थिक आणि व्यवसायविषयक गरजा एकाच क्लिकवर पूर्ण करण्यासाठी उद्योग प्लस ही डिजिटल व्यवस्था तयार करण्यात आली आहे. येथे त्यांना व्यवस्थापन, अर्थपुरवठा, सुरक्षा, गुंतवणूक, सल्ला आणि व्यवसाय चालवण्यासाठीच्या आणि वाढवण्यासाठीच्या इतर सेवा मिळू शकतील. आदित्य बिर्ला कॅपिटलच्या वेबसाईटवरून ही सेवा त्यांच्या ग्राहकांना मिळेल. येथे व्यवसायासाठी सर्व प्रकारची कर्जे मिळू शकतील.
आदित्य बिर्ला कॅपिटलने नुकतेच आपल्या ग्राहकांना डिजिटल पेमेंटचे पर्याय देण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनबरोबर सहकार्य केले आहे. ही सुविधादेखील एमएसएमईना मिळेल. उद्योग प्लसद्वारे एमएसएमईना आपला व्यवसाय अनेक पटीने सहजपणे वाढवणे शक्य होईल. येथे दहा लाखापर्यंतची व्यवसाय कर्जे कागदपत्रविरहित पद्धतीने मिळतील. कर्ज मिळवून देण्यासाठी उद्योग प्लस ही सेवा सरकारी तसेच खासगी ई-कॉमर्स वेबसाईटबरोबर जोडलेली आहे. यात एमएसएमईना अन्य सेवा देण्यासाठी अनेक आघाडीच्या कंपन्यांशी सहकार्य करण्यात आले आहेत. याद्वारे त्यांना बिझनेस नेटवर्किंग, डिजिटल तसेच ई कॉमर्स सेवा, प्रवास, झिरो बँक बॅलन्स अकाऊंट, अकाऊंटिंग, पेरोल, करभरणा आदी सेवा मिळतील, अशी माहिती आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सीईओ विशाखा मुळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT