मुंबई

गोदरेज इंटिरिओचा केएमआरसीएलशी करार

CD

मुंबई, ता. ३० : गोदरेज बॉयसचा फर्निचर सोल्युशन्स ब्रॅंड ‘गोदरेज इंटिरिओ’ने कोलकात्यामधील हावडा येथील मेट्रो कॉरिडॉरमधील मेट्रो स्थानकांचे इंटेरियर डिझाईनचे काम पूर्ण केले आहे. हे भारतातील सर्वांत खोल मेट्रो कॉरिडॉर असल्याचे सांगितले जात आहे. ही स्थानके जमिनीखाली ३३ मीटर म्हणजे नऊ मजली इमारतीएवढी खोल आहेत.

यासाठी गोदरेज इंटिरिओने कोलकाता मेट्रो प्राधिकरणाशी केलेल्या करारानुसार बांधकाम, काचेची कामे, प्लम्बिंग आणि जमिनीची कामे आदींचा समावेश आहे, अशी माहिती गोदरेज इंटिरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख स्वप्नील नगरकर यांनी दिली. मेक इन इंडिया मिशनच्या अनुषंगाने गोदरेज इंटेरिओने सातत्याने देशाच्या पायाभूत सुविधा उभारणीमध्ये आघाडीची भूमिका बजावली आहे. हे मेट्रो स्थानक या वर्षाच्या अखेरीस चालू होईल. त्यामुळे सुमारे सात लाख प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर वाहतुकीचा पर्याय मिळेल. देशातील सक्षम सार्वजनिक वाहतूक जाळ्यातील अद्वितीय प्रवासी अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात गोदरेज इंटिरिओने २,७०० कोटी रुपयांचा महसूल गोळा केला. यातील टर्नकी इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स व्यवसायाने याच आर्थिक वर्षात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला. गोदरेज इंटिरिओने कोची मेट्रो, मुंबई मेट्रो लाईन आणि अशा अनेक प्रकल्पांसाठी विविध मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि सरकारी प्राधिकरणांशी करार केले आहेत. त्यामुळे कंपनीला आर्थिक वर्षात पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ३३५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT