मुंबई

रुग्णांच्या वाॅर्ड नातेवाईकांचीच गर्दी डॉक्टर व परिचारिका हैराण

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील वाॅर्डमध्ये नातेवाईकांच्या वाढत चाललेल्या गर्दीचा त्रास परिचारिका आणि डॉक्टरांना सहन करावा लागत आहे. वाढत्या गर्दीमुळे डॉक्टर आणि परिचारिकांना रुग्णांवर उपचार करणेही कठीण होत असल्याने ते नाराजी व्यक्त करत आहेत.
पालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये एका रुग्णासोबत दोनपेक्षा जास्त नातेवाईक येत आहेत. परिणामी रुग्णांची तपासणी, खाट नीट करणे आणि इतर गोष्टींत अडचणी निर्माण होत आहेत. गर्दी वाढल्याने रुग्ण शोधणेही अवघड होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याबाबत परिचारिकांनी अधिष्ठाता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या २१, २२ आणि २३ अशा तिन्ही पुरुषांच्या वाॅर्डमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याचे चित्र असल्याने डाॅक्टर आणि परिचारिका हैराण झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी एक कंत्राटी परिचारिका रुग्ण तपासताना खाटेशेजारी झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यात पाय अडकून पडली. त्यामुळे रुग्णाची तपासणी करताना तरी त्यांच्या नातेवाईकांनी खाटेशेजारील मोकळ्या जागेतून बाजूला जाणे अपेक्षित आहे. जखमी झालेल्या संबंधित परिचारिकेला मदतही मिळाली नव्हती. त्यामुळे अशा गंभीर विषयावर रुग्णालय प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण राठी यांनी नातेवाईकांच्या गर्दीची समस्या लवकर सोडवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. एका अन्य अधिकाऱ्याने त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

व्हेंटिलेटरच्या प्लगमध्ये मोबाईल चार्जिंग!
    व्हेंटिलेटरसाठी असलेल्या प्लगमध्ये रुग्ण चक्क मोबाईल चार्ज करत असल्याचेही प्रकार घडत आहेत. परिणामी प्लग नादुरुस्त होत असल्याने व्हेंटिलेटर वापरायच्या वेळी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. असे प्रकार रोखल्यास नातेवाईक कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. त्यामुळे अधिष्ठात्यांनी लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी डॉक्टर आणि परिचारिका करत आहेत. त्याबाबत लवकरच पत्र देणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT