मुंबई

चौथ्या दिवशीही पावसाची शक्यता

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः अवकाळी पाऊस आणि वाऱ्याची वाढलेली गती यामुळे मुंबईतील प्रदूषण कमी झाले आहे. मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रदूषणाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळणार आहे.
मुंबईत पावसाळी वातावरण अद्याप कायम आहे. भारतीय हवामान विभागाने, बुधवारी अंशतः ढगाळ आकाश राहणार असून मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. त्यापुढील ४८ तासांसाठी पावसाचा इशारा नसला तरी वातावरण ढगाळ राहील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मुंबईतील हवेचा स्तर केवळ ५९ गुणवत्ता निर्देशांकासह समाधानकारक नोंदवण्यात आला आहे. अनेक भागांतील हवेचा स्तर उत्तम नोंदवण्यात आला आहे. यामध्ये वरळी २३, भांडुप ३७, कुलाबा ४७, मालाड ४९ यांचा समावेश आहे. शिवाय अंधेरी ५१, माझगाव ५५, बोरिवली ६७, चेंबूर ७०, बीकेसी १०७ अशी हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली असून या परिसरात हवेचा स्तर समाधानकारक आहे. मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईतील हवेचा स्तरही समाधानकारक असून तेथे ८६ हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT