मुंबई

जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन निमावली धाब्यावर

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयआयटी मुंबईच्या मदतीने केलेल्या संयुक्त पाहणीत जैववैद्यकीय कचऱ्याच्या व्‍यवस्थापनाच्या नियमावलीचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर या कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत मंडळाने कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करून १ एप्रिलपासून कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभरात जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्यरीत्या व्यवस्थापन करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नुकतीच राज्यभरात सामूहिक जैववैद्यकीय व्‍यवस्थापन केंद्रांची तपासणी करण्यात आली. आयआयटी मुंबईने ही पाहणी करून अहवाल दिला आहे. या अहवालात काही रुग्णालये, दवाखाने, नर्सिंग होम हे जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६चे योग्य पालन करत नसल्याचे उघड झाले आहे. या अधिनियमाद्वारे जैववैद्यकीय कचऱ्याचे रुग्णालयाच्या ठिकाणी विलगीकरण, योग्य ती साठवणूक व त्याचे बारकोडिंग करणे आवश्‍यक आहे. मात्र, हे होत नसल्याचे सामूहिक जैववैद्यकीय व्यवस्थापन केंद्रचालकांनी आयआयटी मुंबईच्या निदर्शनास आणून दिली.
------
काय आहेत निर्देश?
- प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक, वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळा या सर्व आस्थापनांना प्राधिकृत जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन केंद्राकडे नोंदणी करणे, तसेच अधिनियमानुसार वैद्यकीय कचऱ्याचे विलगीकरण, बारकोडिंगनुसार साठवणूक केलेल्या कचऱ्याची सामूहिक सुविधा केंद्रांकडे पाठवणी करणे अनिवार्य असल्याचे निर्देश दिले आहेत.
- याची अंमलबजावणी न करणाऱ्या वैद्यकीय आस्थापनांवर १ एप्रिलपासून कठोर कारवाई केली जाणार आहे. याची नोंद राज्यातील वैद्यकीय आस्थापनांनी घ्यावी, असे आवाहनही मंडळाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT