मुंबई

प्रशासकीय अनास्थेने कामगारांचा बळी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : सेप्टिक टँकमध्ये पडून बुधवारी दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिन्याभरातील ही दुसरी घटना असल्याने कामगारांप्रती शासनाची असलेली उदासीनता आणि पालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणामुळे कामगारांचा बळी गेल्याचा आरोप कामगार संघटनांमधून होत आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे कुशल, अकुशल कामगारांची मोठी मागणी येथे असते. यामध्ये गरीब, दलित कामगारांची संख्या लक्षणीय आहे; पण या कामगारांच्या सुरक्षेकडे फारसे कुणाचे लक्ष नाही. बुधवारी मालाड पूर्व येथील रहेजा टॉवर येथील खासगी इमारतीच्या सेफ्टी टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार गंभीर जखमी आहे. तर २१ मार्च रोजी घडलेल्या दुसऱ्या घटनेत मालाडच्या मालवणीत सार्वजनिक शौचालयामध्ये तीन कामागारांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात अशा प्रकारच्या घटनांमधून २५ कामगारांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. यात मुंबईतील दहा जणांचा समावेश आहे. या प्रकरणामध्ये पालिकेने संबंधित कंत्राटदाराला फक्त कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. मात्र, कोणतीही ठोस कारवाई केली झाली नसल्याने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याच्या फक्त वल्गना केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याचा आरोप कामगार संघटनांकडून केला आहे.
----------------------------------------------------
अकुशल कामगारांचा वापर
मुंबईत २५ हजारांहून अधिक सेप्टिक टँक आहेत. यातील काही खासगी आहेत. पालिका प्रशासनाकडे असलेली आधुनिक सक्शन पंपाची सुविधा खासगी संस्थांना देत नाही. यामुळे बहुतांश विकसक अकुशल कामगारांना साफसफाईसाठी उतरवतात. तर काही ठिकाणी सेप्टिक टँकमध्ये माणसांना उतरवण्यास बंदी असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
--------------------------------------------------------
मुंबई शहरातील सेप्टिक टँकचा विषय अतिशय गंभीर आहे. अशा दुर्घटनांसाठी पालिका प्रशासनाला जबाबदार धरायला हवे. सेप्टिक टँक साफसफाईवर पालिका प्रशासनाचे नियंत्रण असायला हवे.
- मिलिंद रानडे, कामगार नेता
.....................
पालिका प्रशासनाला केवळ निविदाप्रक्रियेमध्ये रस असल्याचे दिसते. लोकांच्या सुरक्षेबाबत त्यांना काहीही देणेघेणे नाही. पालिकेत सध्या लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनाचे फावले आहे. आयुक्तांनी निविदेपेक्षा कामगारांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहावे.
- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara fraud Case: तमिळनाडूच्या महिलेची साताऱ्यात फसवणूक; १२ लाख अन् सात ताेळे साेने, परस्‍पर विक्री, विश्वास नडला, नेमकं काय घडलं!

Paithan News: जायकवाडी धरणाचा वीजपुरवठा अखेर पूर्ववत ; नाथसागर धरण अंधारात

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इराणवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले, मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

SCROLL FOR NEXT