मुंबई

अकरावी प्रवेशाचे यंदाही मोठे आव्हान

CD

संजीव भागवत
मुंबई, ता. २१ : मुंबई महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील वर्षी केंद्रीय ऑनलाईन प्रवेशासाठी तीन लाख ८९ हजार ६७५ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी दोन लाख ६७ हजार ८६२ जागांवर म्हणजेच केवळ ६९ टक्के प्रवेश झाले; तर उर्वरित एक लाख २१ हजार ८१३ जाग रिक्त राहिल्या होत्या. यंदाही या क्षेत्रात काही नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आल्याने रिक्त जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या रिक्त जागा भरण्याचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील अल्पसंख्याक आण‍ि इतर सर्वच महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जातात. यासाठी मुख्य आणि विशेष प्रवेश फेऱ्यांमधून प्रवेश दिले जातात, यात काही ठराविक महाविद्यालयांनी आपल्याकडील प्रवेश अधिक व्हावेत यासाठी विद्यार्थी आणि काही मध्यस्थीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या मुख्य फेऱ्यांमध्ये प्रवेश घेऊ दिले जात नसल्याने रिक्त जागांचा प्रश्न निर्माण होत असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय काही खासगी क्लासेस आणि ठराविक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये चुकीच्या पद्धतीने इंटिग्रेटेड स्वरूपाचे प्रवेश केले जातात, त्यामुळेही इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या जागा रिक्त राहतात. यावर कोणीही लक्ष देत नसल्याने एकाच वेळी पालक आणि विद्यार्थ्यांचीही आर्थिक लूट होते, असा आरोप बुक्टोचे माजी उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे यांनी केला आहे.
मुंबईत दोन हजार ३८५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील वर्षी झालेले अकरावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे प्रवेश वादात सापडले होते. यामुळे रिक्त जागांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यात शालेय शिक्षण विभागाकडून अनेक संस्थांना कनिष्ठ महाविद्यालयांची परवानगी दिली जात असल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी लाखो जागा रिक्त राहतात. या रिक्त राहणाऱ्या जागा भरण्याचे मोठे आव्हान यंदाही शालेय शिक्षण विभागापुढे असून त्यावर मार्ग काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, असा सवाल फुले-शाहू-आंबेडकर विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण यादव यांनी केला आहे.
--
२४२ महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश
मागील वर्षी झालेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत मुंबईतील २४२ महाविद्यालयांध्ये शून्य प्रवेश झाले होते. ही बहुतांश महाविद्यालये ही नव्याने स्थापन झालेली आणि काही अनुदानित महाविद्यालये होती; तर सर्वाधिक प्रवेश झालेल्या महाविद्यालयांमध्ये मुंबईतील अल्पसंख्याक आणि नामांकित महाविद्यालयांचा समावेश होता. यात ३२० महाविद्यालयांमध्ये २० टक्के तर ४४३ मध्ये ५० टक्के आणि ३०६ महाविद्यालयांध्ये १०० टक्के प्रवेश झाले होते. ही १०० टक्के प्रवेश झालेल्यांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरातील महाविद्यालये अधिक होती.
--
कोट्यांच्या जागांचे प्रवेश
अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत व्यवस्थापन, इनहाऊस आणि अल्पसंख्याक अशा तीन कोट्यांतील प्रवेश होतात. मागील वर्षी मुंबईत असलेल्य‍ा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १८ हजार ५० व्यवस्थापन कोट्यासाठी जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १० हजार ९२ जागांवर प्रवेश झाले होते; तर नियम मोडीत काढून महाविद्यालयांनी ६ हजार ४२८ जागा मुख्य प्रवेशासाठी प्रत्यार्पित केल्या नव्हत्या; तर इनहाऊससाठी २५ हजार ५५४ इतक्या जागा होत्या त्यापैकी ९ हजार ४६७ जागांवर प्रत्यक्ष प्रवेश झाले होते; तर अल्पसंख्याक कोट्यासाठी सर्वाधिक अशा १ लाख ३ हजार ९७५ जागा होत्या, त्यापैकी केवळ ३६ हजार ३७९ जागावर प्रवेश झाले होते.
--
अल्पसंख्याक प्रवेशाची संख्या
१) मुंबईत असलेल्या ४८१ अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये १ लाख ३ हजार ९७५ जागा उपलब्ध होत्या; तर यापैकी केवळ ३६ हजार ३७९ जागांवर प्रवेश झाले; तर ४९ हजार २६६ जागा या संस्थांनी अखेरच्या टप्प्यात प्रत्यार्पित केल्या. तर १८ हजार ३३० जागा केंद्रीय प्रवेशासाठी प्रत्यार्पित न करता त्यावर बेकायदेशीरपणे प्रवेश सुरू ठेवले होते.
२) मुंबईत मागील वर्षी ४८१ अल्पसंख्याक महाविद्यालये होती. त्यापैकी ३२४ मध्ये प्रत्यक्षात केंद्रीय पद्धतीने प्रवेश झाले; तर प्रवेश करूनही रिक्त राहिलेल्या जागा २९७ महाविद्यालयांनी केंद्रीय प्रवेशासाठी प्रत्यार्पित केल्या नाहीत. त्या अखेरच्या टप्प्यापर्यंत बेकायदेशीरपणे भरण्याची प्रक्रिया करत राहिले. विशेष म्हणजे मुंबईतील १५ महाविद्यालयांमध्ये १०० टक्के प्रवेश झाले; तर १०६ मध्ये ५० टक्के आणि तब्बल १५८ मध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून एकही प्रवेश करण्यात आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT